Join us  

आईबाबांनी मुलांसमोर कधीच मारु नयेत ‘या’ गप्पा, मुलांचा आत्मविश्वास जातो-मुलं जगतात घाबरुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2024 2:03 PM

Biggest Mistake Parents Make: मुलांविषयी आणि मुलांसमोर बोलताना पालकांनी काही गोष्टींचं भान ठेवलंच पाहिजे. बघा तुम्हीही नेमकं तिथेच चुकता का?

ठळक मुद्देमुलांच्या बाबतीत मुलांंसमोरच इतरांशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर दोघांचेही चांगले गुण सांगा. वाईट गुण स्वतःच्या मनात ठेवा

बऱ्याचदा असं होतं की एकदा गप्पांमध्ये रंगून गेलं की आपण काय बोलतो आहोत, कुणासमोर बोलतो आहोत, याचं भान अनेकांना राहत नाही. बऱ्याच पालकांचंही तसंच होतं. गप्पांच्या ओघात ते अशा काही गोष्टी बोलून जातात ज्या त्यांनी मुलांसमोर बोलायला नको आहेत. ज्या पालकांना दोन मुलं असतात त्यांच्याकडून तर ही चूक बऱ्याचदा होते. अगदी नकळत ते स्वत:च्याच दोन अपत्यांमध्ये तुलना करतात आणि मग त्याचा त्रास मुलांना होतो (Biggest Mistake Parents Make). यामुळे मुलांवर नेमका कसा परिणाम होऊ शकतो ते पाहा...(parents should avoid this mistake if you have 2 kids)

 

तुम्हीही तुमच्या दोन मुलांमध्ये तुलना करता का?

दोन मुलांविषयी जेव्हा पालक तिसऱ्या व्यक्तीशी गप्पा मारतात तेव्हा नकळत त्यांच्या बोलण्यात अशी काही वाक्यं येतात ज्यामुळे मुलांची मन दुखावली जाऊ शकतात. असं वारंवार होत गेलं तर मुलांचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.

रोपांसाठी करा खडूचा वापर! बघा मस्त ट्रिक- रोपं वाढतील भराभर, इतर खतांची गरजच नाही

याविषयीचा एक छानसा व्हिडिओ पॅरेंटिंग एक्सपर्टने vishruti_joyes_parenting या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की बऱ्याचदा बोलताना पालक म्हणतात की 'माझा एक मुलगा खूपच मोकळं बोलतो, दुसरा मात्र अबोल आहे', 'ही खूप अभ्यास करते, पण त्याचा मात्र अभ्यासाच्या नावाने सगळा गोंधळ आहे..' असं तुम्ही वारंवार बोलत गेलात तर ते मुलांच्या मनात ठासत राहातं आणि मुलं तसंच वागत राहतात. 

 

आपल्याला काय येतं या गोष्टी मागे पडत जातात आणि पालकांचे निगेटिव्ह ऐकून आपल्याला काय येत नाही याचाच ते जास्त विचार करू लागतात. त्यामुळे जर मुलांच्या बाबतीत मुलांंसमोरच इतरांशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर दोघांचेही चांगले गुण सांगा.

'या' पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी कंगना रानौतला खूप आवडते- बघा रेसिपी- मुलंही आवडीने खातील

वाईट गुण स्वतःच्या मनात ठेवा आणि मुलांनी कुठे सुधारायला पाहिजे हे थेट त्या मुलाशी एकटेपणात बोला.. भावंडांशी जर वारंवार तुलना होत गेली तर मुलांच्या मनात नकळतपणे भावंडांबद्दलही एक अढी निर्माण होते. तसं तुमच्या मुलांच्या बाबतीत होऊ द्यायचं नसेल तर दोघांमध्ये तुलना न करण्याचा एवढा नियम पाळाच..

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं