आपल्या मुलांनी गुणी, समजूतदार व्हावं, त्यांचं सगळ्यांनीच कौतूक करावं असं प्रत्येक पालकालाच वाटतं. खरंतर आपलं मुल असंच असावं अशी पालकांची इच्छा असते. पण फक्त इच्छा असून काहीही होत नाही. कारण अशी मुलं घडवायची असतील तर पालकांनी त्यासाठी काही गोष्टी करणं, मुलांना काही सवयी लावणं गरजेचं असतं. त्या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहा (how to make our child mature and sensible)... तुम्ही मुलांना या काही गोष्टी शिकवल्या तर नक्कीच तुमच्या मुलांची चारचौघांत वाहवा होईल...(parents should teach 5 essential things to their kids)
मुलांना कोणत्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे?
१. आजच्या जगात आपलं म्हणणं मांडता येणं खूप गरजेचं आहे. यातूनच मुलांना आत्मविश्वास वाढत जातो. त्यामुळे पालकांनी सगळ्यात आधी मुलांना उत्तम कम्युनिकेशन स्किल्स शिकवावेत. लहानपणातच मुलांनी ते आत्मसात केले, तर पुढे त्यांच्यासाठी अनेक गोष्टी सहज सोप्या होतील.
२. दुसऱ्यांच्या भावना मुलांनी समजून घेणंही खूप गरजेचं आहे. आपण अमूक एखादी गोष्ट केल्यास किंवा न केल्यास त्याचा दुसऱ्याच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो, हे जर मुलांनी कमी वयातच लक्षात घेतलं तर ते खूप मॅच्युअर बनतील. त्यांची वर्तणूक आपोआप सुधारेल.
३. थँक यू, प्लिज या शब्दांचा वापर रोजच्या जगण्यात कुठे आणि कसा करावा, एखाद्याला कशी आणि कुठे मदत करावी हे मुलांना जरुर शिकवा...यातून समोरच्या व्यक्तीवर मुलांची खूप वेगळी छाप पडते.
काळवंडलेली मान- गुडघे होतील स्वच्छ, फक्त ३ पदार्थ वापरून करा मसाज, टॅनिंग होईल कमी...
४. मुलांना सगळ्या प्रकारच्या आणि प्रत्येक आर्थिक गटातल्या मुलांसोबत राहायला शिकवा. यातून मुलांना वेगवेगळ्या लोकांशी जुळवून घेण्याची, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची सवय लागेल.
अक्षय्य तृतीया: आम्रखंड करणं किचकट वाटतं? बघा सगळ्यात सोपी रेसिपी, १० मिनिटांत आम्रखंड तयार..
५. वेळेचं महत्त्व मुलांना शिकवा. त्यातून ते वेळेची कदर करायला शिकतील. वेळेचं गणित अचूक जमलं तर करिअरपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक ठिकाणी मुलं यशस्वी होतील.