काय गं तो आमच्या निनादचा मित्र, कसल्या ढोल्या. आईचं लक्ष नाही त्याच्याकडे. फुगला इतका की फुटायचा! असं हसून सांगणारी कुणी आई. ती फक्त इतरांच्या मुलाला नावं ठेवत नसते तर त्याचवेळी घरात आपल्या मुलालाही बारकुडा, हडकुळा, कुपोषित म्हणत असते. मुलांना सतत अशी वजनावरुन नावं ठेवणं त्यांच्या स्व प्रतिमेविषयी आपण कायमचे प्रश्न निर्माण करतो हे पालकांच्या लक्षातही येत नाही. कुणाला काळी, कुणाला घारी, जाडी, चष्मिश,असं म्हणणं हे मुलांच्या मनाशी अतिशय क्रूर खेळ आहेत.
(Image : google)
हे कशानं होतं?
१. छान दिसणं हा आयुष्यातला महत्वाचा निकष होऊन बसला आहे. त्याला इन्स्टा प्रेशर असं म्हणतात. आपले फोटो उत्तम यावेत, त्यासाठीचे फिल्टर, चेहऱ्यावरचे डाग, असे अनेक प्रश्न अनेक लहांन मुलांनाही गंभीर वाटतात. एक वाईट कॉमेण्ट त्यांच्या जिव्हारी लागते इतका हा सोशल मीडियाचा नाजूक काळ.२. कुणी जाड असेल, वजन जास्त असेल तर मोठी माणसंच नाही समवयस्कही त्या मुलामुलींना हिणवतात. बॉडी शेमिंग ही गोष्ट पूर्वीही होती आत जर जास्त गंभीर झाली आहे.३. आपण मुलांना जेव्हा बारीक होण्याचे धडे देतो तेव्हा त्यांना बारीक का व्हायचे आहे, फिटनेस म्हणजे नेमके काय, स्व स्वीकार कसा करायचा हे कुणीच शिकवत नाही.४. आईवडील इतर मुलांविषयी, मोठ्यांविषयी त्यांच्या रंगरुपांविषयी काय आणि कसे बोलतात यावर मुलंही आपली मतं ठरवतात. त्यामुळे मुलांना आणि त्यांच्या मित्रांना रंगरुपावरुन लेबल लावणे सोडले पाहिजे. ५. सतत दिसण्यावरुन हेटाळणी झाली तर आपल्यातच काहीतरी कमी आहे असं मुलांना वाटतं. अजून मानसिक समस्या वाढतात. अनेक मुलं मित्रमैत्रिणींशी खेळणं बंद करतात. कुढी होतात.६. त्यामुळे मुलांना सतत टोमणे मारणे, बोलणे, नावं ठेवणेही बंद करायला हवे.