Lokmat Sakhi >Parenting > भुणभुण नको म्हणून तुम्हीही मुलांच्या सगळ्या गोष्टींना ‘हो’ म्हणता? तज्ज्ञ सांगतात, मुलांनी नकारच ऐकला नसेल तर..

भुणभुण नको म्हणून तुम्हीही मुलांच्या सगळ्या गोष्टींना ‘हो’ म्हणता? तज्ज्ञ सांगतात, मुलांनी नकारच ऐकला नसेल तर..

Permissive parenting tips for child tantrums : कुठे प्रेमानी वागायचं आणि कुठे शिस्त लावायची हे पालक म्हणून कळायलाच हवं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2024 09:45 AM2024-10-27T09:45:22+5:302024-10-28T18:13:43+5:30

Permissive parenting tips for child tantrums : कुठे प्रेमानी वागायचं आणि कुठे शिस्त लावायची हे पालक म्हणून कळायलाच हवं...

Permissive parenting tips for child tantrums : Do you also say yes to all the children's things...Experts say that by doing this... | भुणभुण नको म्हणून तुम्हीही मुलांच्या सगळ्या गोष्टींना ‘हो’ म्हणता? तज्ज्ञ सांगतात, मुलांनी नकारच ऐकला नसेल तर..

भुणभुण नको म्हणून तुम्हीही मुलांच्या सगळ्या गोष्टींना ‘हो’ म्हणता? तज्ज्ञ सांगतात, मुलांनी नकारच ऐकला नसेल तर..

हल्लीच्या काळात कुठे ३, ४ मुलं असतात. आमचं एकुलतं एक मूल आहे. त्याचे लाड नाही करणार तर कोणाचे करणार?” “एवढं कमवतो कोणासाठी?” “अहो, तो किंवा ती इतका हट्टीपणा करतात, की शेवटी नाईलाज होतो आणि ते म्हणतील तसं करुन टाकतो, सततची भुणभुण कोण ऐकत राहणार.” अशी अनेक वाक्य आपल्या कानावर पडत असतात. काही ना काही कारणांनी तुम्हीही मुलांचे सगळे हट्ट पुरवत असाल आणि त्यांनी काही मागितल्यावर लगेचच ती गोष्ट पुरवत असाल तर याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात समजून घ्यायलाच हवं. प्रसिद्ध पालकत्व समुपदेशक श्वेता गांधी यांनी यासंदर्भात काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. अशाप्रकारचे परमिसिव्ह पॅरेंटींग मुलांसाठी आणि पालकांसाठीही कसे चांगले नसते याबाबत त्यांनी काही गोष्टी नेमकेपणाने सांगितल्या आहेत, त्या कोणत्या पाहूया.. 

परमिसिव्ह पॅरेंटिंग म्हणजे काय ? 

मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण करणे, त्यांना नकाराची सवय न लावणे, ते मागत असलेल्या गोष्टीच्या आवश्यकतेचा विचार न करता मुलांना वस्तू पुरवणे अशाप्रकारच्या पालकत्वाला परमिसिव्ह पॅरेंटिंग म्हणतात. अशाप्रकारच्या पालकत्वामुळे मुले अधिकाधिक हट्टी होत जातात.  त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने होणे अपेक्षित असते. जर तसे नाही झाले तर ते आक्रस्ताळेपणा करतात. अशा मुलांना नियम, सीमा कळत नाहीत. विशेष म्हणजे जे पालक अशाप्रकारे मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण करतात त्यांना स्वयंशिस्त व भावनिक नियमन करण्यात अडचणी येतात. या मुलांना समाजात वावरणेही अवघड जाते. असे होऊ नये म्हणून प्रेम आणि लाड करतानाच मुलांना शिस्त आणि नियम यांचीही ओळख वेळीच करुन द्यायला हवी. आता हे करायचे म्हणजे नेमके काय करायचे पाहूया...

अशावेळी मुलांना शिस्त कशी लावावी? 

१. स्पष्ट सीमारेषा असाव्या – मुलांसाठी काही साधे व सोपे नियम आखावेत. त्या नियमांशी पालकांनी घट्ट असावे. त्यामुळे मुलांना नियम, सीमा कळतात आणि त्यानुसार ते स्वतःला बदलतात.
 
२. संतुलित शिस्त शिकवा – शिस्तीच्या बाबतीत कठोर नाही पण प्रेमळ तरीही दृढ राहत नियमांचे पालन करत त्यामागचे उद्देश स्पष्टपणे समजावून सांगावेत. त्याचा मुलांच्या विकासासाठी नक्कीच फायदा होतो. 

३. आत्मनिर्भर होण्यावर भर द्या – मुलांना त्यांच्या जबाबदार्‍या पार पाडू द्या. त्याचे परिणाम काय होतात ते त्यांना शिकू द्या. 

४. भावनांवर नियंत्रण शिकवा -  मुलांना त्यांच्या भावना ओळखण्यास आणि त्यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यास मदत करायला हवी, यामुळे मुलांमध्ये नकळत शांत राहण्याची वृत्ती निर्माण होईल.  



५. समस्या सोडवण्यास प्रोत्साहन द्या – मुलांना त्यांच्यासमोर येणार्‍या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी, जबाबदारी घेण्यासाठी प्रोत्साहित करा. 

६. स्क्रीन टाइम कमी करा – सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांना खेळ, वाचन अशा गोष्टींमध्ये रमवा, जेणेकरुन त्यांचा स्क्रीन टाइम कमी होईल. स्क्रीन टाइमबाबतची सीमारेषा स्पष्ट असायला हवी म्हणजे त्याचा त्रास होणार नाही. 

Web Title: Permissive parenting tips for child tantrums : Do you also say yes to all the children's things...Experts say that by doing this...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.