स्तनपान हे बाळासाठी अमृतपान असतं. सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचे दूध पाजायला हवे. ते बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी स्तनपान खूप महत्वाचे असते. प्रतिकार शक्तीही बाळाची चांगली होते. मात्र हल्ली सोशल मीडियातून उलटसुलट माहिती फिरते आणि नवमातांचे कनप्यूजन वाढते. स्तनपान करण्यापूर्वी स्तन आणि स्तनाग्र धुवा, हायजिन सांभाळा असे मॅसेज फिरतात. ते कितपत खरे. शारीरिक स्वच्छता माता आणि बाळासाठी महत्त्वाचीच असते पण त्यातलं शास्त्रीय सत्य काय?
स्त्रीरोगतज्ञ डॉ. रम्या काबिलन सांगतात, '' स्तनपान करण्यापूर्वी स्तनाग्र धुण्याची गरज नाही. आईला स्तनपात केल्यानंतर फार चिकट किंवा घामट वाटत असेल तर कोमट पाण्यानं पुसायला किंवा ३/४ फिडिंग नंतर ओल्या फडकाने पुसायला हरकत नाही'(Personal hygiene for breastfeeding mothers).
समज-गैरसमज कोणते?
१. स्तनदा मातांनी शारीरिक स्वच्छता राखली पाहिजे. मात्र त्यासाठी बाळाला दूध पाजण्यापूर्वी स्तन किंवा निपल्ल साबणाने धुण्याची गरज नाही.
२. स्तनाग्र हूळहूळे होणे, त्यांना ड्राय वाटणे, दुखणे शक्य आहे. पण दुधानं ते काही अहशी आपोआप बरे होते. त्यात अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि जखमा बरे करण्याचे गुणधर्म आढळतात.
३. जखमा किंवा अन्य काही इन्फेक्शन असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.