Join us  

मुलं गुणी-समंजस व्हावी म्हणून पालकांनी कराव्या ५ गोष्टी, वाईट संगतीची भीती नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 4:30 PM

Positive Parenting Tips : मुलांना पालक काय सांगतात यापेक्षा पालक त्यांच्याशी आणि इतरांशी कसं वागतात हे पाहून ते शिकतात. त्यामुळे पालकांनीही आपल्या वर्तनात बदल केला तर मुलंही आपसूक तेच शिकतात.

शिस्त आणि धाक यात अंतर असते. पालकांनी आपल्या मुलांना धाकात ठेवणं वेगळं आणि स्वत:सह त्यांच्यासाठी काही नियम तयार करणं, ते घरात सर्वांना लागू असणं महत्त्वाचं. मुलांनी शहाण्यासारखं वागावं असं वाटत असेल तर पालकांनीही तितकंच शहाण्यासारखं वागायला हवं. मुलं पालकांचं ऐकण्यापेक्षा त्यांचं पाहून पाहून शिकतात. (5 Ways to Improve Your Parenting Skills) त्यामुळे आपणही मुलांसह अतिशय प्रेमानं, शिस्तीत पण भरभरुन जगावं हे उत्तम. त्यातून मुलांना आपोआप काही गोष्टी कळतील, ते शिकतील आणि तसं वागतीलही. (Top 5 Good Parenting Tips)

रागावर नियंत्रण ठेवणं

लहानपणीच रागावर नियंत्रण कसे ठेवायचे हे पालकांनी मुलांना शिकवले तर ते मोठे झाल्यावर त्यांचे भविष्य चांगले होईल. कारण असे केले नाही तर मोठी होणारी मुले इच्छा असूनही रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. घरातील वडीलधाऱ्यांना सतत रागवायची सवय असेल तर ती बदलावी लागेल.

पायलट लेकाच्या नकळत विमानात येऊन आईनं दिलं गोड सरप्राईज दिलं; आईला पाहताच पायलटला भरून आलं

वाईट शब्दांवर नियंत्रण

अनेक वेळा मुले इतरांना पाहिल्यानंतर किंवा टीव्हीवर पाहिल्यानंतर अपशब्द वापरण्यास सुरुवात करतात. त्याला असे वाटते की अशा प्रकारे ते सर्वांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करू शकतात. पण पालकांनी मुलांना तेव्हाच अडवलं पाहिजे जेव्हा त्यांना त्यांच्या तोंडून काही अपशब्द पहिल्यांदा ऐकू येतात. मुलांना समजावून सांगा की असे केल्याने त्यांच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होईल.

चांगली वागणूक

घरात लहान मुलांना टोमणे मारले की जेवण न करणे, वस्तू तोडणे, रागाने दरवाजा बंद करणे किंवा गच्चीवर बसणे अशी कामे करतात. असे करणे म्हणजे मोठ्यांचा अपमान आहे. त्यांना समजावून सांगा की घरातील कोणत्याही सदस्यासोबत काही समस्या असल्यास त्याबद्दल मोकळेपणाने बोला.

स्वयंपाक करताना घाम येऊ नये म्हणून महिलेचा भन्नाट जुगाड; अशी क्रिएटिव्हिटी कुणी पाहिली नसेल..

इतरांना मदत 

सुरुवातीपासूनच इतरांना मदत करण्याची गुणवत्ता मुलांमध्ये रुजवा. त्यांना सांगा की कोणाचीही मदत करण्यापासून कधीही मागे हटू नका. लहान भावंडांची काळजी घेणे आणि त्यांना मदत करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे पालकांनी मुलांना सांगावे.

कोणावरही अवलंबून राहू नका

मुलांना हे शिकवणे देखील आवश्यक आहे की त्यांनी त्यांच्या कामासाठी नेहमी स्वतःवर अवलंबून राहावे. मुलांना त्यांचे ताट धुण्यापासून ते बेडशीट स्वच्छ करण्यापर्यंत सर्व काही शिकवले पाहिजे. यामुळे ही सवय मुलांच्या मनात कायम राहते आणि ते त्याप्रमाणे वागतात. 

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्स