Join us  

आईबाबांनी मुलांशी कोणत्या वयात काय बोलावे - कसे वागावे? मुलं आईबाबांपासून तुटतात - भांडतात कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2024 5:35 PM

Positive Parenting Tips | Child Development : ५ ते १५ वयापर्यंत मुलांची योग्य वाढ आणि शिस्त लावणं गरजेच..

मुलांचे संगोपन करताना अनेक आव्हाने समोर येतात (Parenting Tips). बऱ्याचदा मुलाला काय बोलावे, त्याला कशा पद्धतीने समजावून सांगावे. हे कळून येत नाही. अशावेळी पालक तज्ज्ञांची मदत घेतात (Child Development). आजकाल पालक मुलांना ओरडण्यास किंवा त्यांच्यावर हात उगारताना घाबरतात. पण योग्य ठिकाणी ओरडणे गरजेच आहे.

काही वेळेस पालकांना अपराधीपणाची भावना मनात येते. जर मुलांना योग्य वळण आणि संस्कार मिळावे असे वाटत असेल तर, बिजनेस एक्‍सपर्ट शकील कादवा यांनी आपल्या स्पीचमधून शेअर केलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा. मुलांचे वाढत्या वयात संगोपन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? पाहा(Positive Parenting Tips | Child Development).

पालकांचा सपोर्ट महत्वाचा

मुलांना नेहमी सपोर्ट द्या. प्रेम द्या. मुलांवर कोणतेही संकट आले तर ते, आई - वडिलांपासून गोष्टी लपवतात. खोटं बोलतात. त्यामुळे पालक म्हणून त्यांच्यावर नेहमी विश्वास दाखवा. त्यांचीही बाजू समजून घ्या. पहिल्या ५ वर्षात मुलांना ओरडू नका. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. 

भातातून जळका वास - भाजीत जास्त मीठ पडलं? ५ किचन हॅक्स; स्वयंपाक होईल परफेक्ट

५ ते १५ वर्षीय मुलांना योग्य संस्कार द्या

मुलांना चांगले शिक्षण देण्यासोबत चांगल्या सवयी लावा. शिस्त लावा. मुलांना भावनिक किंवा मानसिक त्रास होईल अशा शब्दांचा वापर करू नका. वाढत्या वयानुसार सांगोपनातही बदल करा. चूक वारंवार करत असल्यास मुलांना ओरडा. पण इतकंही ओरडू नका की मुलं खचतील.

पांढरे केस डायशिवाय होतील काळे, फक्त ४ पैकी १ पदार्थ न चुकता खा; केस होतील दाट - दिसतील सुंदर

पंधरा वर्षांच्या मुलांबरोबर कसे वागावे

मुलं १५ वर्षांची झाल्यानंतर त्यांच्यासोबत मैत्री करा. मैत्रीसारखे वागल्यास मुलं आपल्या  मनातल्या गोष्टी सहज सांगतील. काही लपवून ठेवणार नाहीत. जर आपण त्यांना सतत ओरडलो तर यामुळे मुलं हट्टी आणि बेशिस्त होऊ शकतात. त्यामुळे त्यांचे मित्र बना, योग्य मार्गदर्शन द्या. यामुळे त्यांना निर्णय घेण्यास अडचण येणार नाही. 

टॅग्स :पालकत्वसोशल व्हायरलमानसिक आरोग्य