प्रत्येक पालकांना आपलं मूल खास असावं आणि इतर मुलांपेक्षा वेगळं असावं असं वाटत असतं. त्याचं सतत कौतुक व्हावं, आपल्या पाल्याने खेळ असो किंवा अभ्यास प्रत्त्येक गोष्टींमध्ये कायम पुढे असावं. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या मुलांची प्रशंसा केली पाहिजे, तसेच त्यांना प्रत्येक गोष्टीत नावाजलं पाहिजे. अशी आजकालच्या आई - वडिलांची (Positive Parenting Tips) इच्छा असते. असे करत असताना मुलांना सगळ्या गोष्टीत परफेक्ट (Positive Parenting Tips Every Parent Should Know) बनवण्याच्या नादात आई वडील त्यांच्या प्रत्येक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असतात. पालक आपल्या मुलांशी कसे वागतात, तसेच ते त्यांच्या भविष्यात घडतात. मुलांना समजावून सांगायचे असेल तर त्यांना नेहमी रागावले पाहिजे असे नाही. तर तुम्ही मुलांना अशा गोष्टी प्रेमाने शिकवू शकता, ज्या त्यांना नेहमी लक्षात राहतात(The power of positive parenting).
आपल्या मुलाने अन्य मुलांसह गर्दीत मिसळण्यापेक्षा ती सोडून यशाच्या मार्गावर पुढे जाताना पाहणे ही प्रत्येक पालकाच्या मनातील इच्छा असते. जर आपल्यालाही हेच हवे असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह पॅरेंटिंगबद्दल (Positive Parenting Strategies You Need to Start Using) माहिती असायला हवी. अशा प्रकारच्या पॅरेंटिंगच्या मदतीने तुम्ही तुमच्या पाल्याचा आत्मविश्वास वाढवू शकता आणि त्याला मानसिकदृष्ट्या निरोगी बनवू शकता. पॉझिटिव्ह पॅरेंटिंगमध्ये नेमके काय करावे आणि कशा पद्धतीने आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे हे पाहूयात(What is positive parenting and how is it done).
पॉझिटिव्ह पॅरेंटिंग म्हणजे काय ?
आपल्या मुलांनी कायम शहाण्यासारखं वागावं अशी प्रत्येक आई - वडिलांची इच्छा असते. मुलांनी चांगलं वागावं याचा प्रयत्न करत असताना प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी त्यांना टोमणे मारणे योग्य नाही. अशावेळी तुम्ही मुलांना शांतपणे आणि प्रेमाने गोष्टी समजावून सांगू शकता. पॉझिटिव्ह पॅरेंटिंग मध्ये एक विशेष गोष्ट लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो तो म्हणजे मुलांनी चांगले काम केल्यावर त्यांची प्रशंसा नक्कीच केली पाहिजे. वेळोवेळी मुलांची प्रशंसा केल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक कळण्यास मदत होते. पालक - मुलाचा संवाद हा त्या कौटुंबिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असतो. एक प्रेमळ, आदरयुक्त नातेसंबंध पालक - मुलाचे नाते मजबूत करतात. पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात. घरात सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी पालकांनी मुलांशी संभाषण करताना पॉझिटिव्ह प्रतिसाद देणे आवश्यक आहे.
पॉझिटिव्ह पॅरेंटिंगचा मुलांवर काय परिणाम होतो ?
२०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या पॉझिटिव्ह पॅरेंटिंग संकल्पनेच्या अभ्यासानुसार, पॉझिटिव्ह पॅरेंटिंगमध्ये शिकवणे, समजून घेणे, नेतृत्व करणे, ऐकणे, सुरक्षा प्रदान करणे आणि मुलांचा आदर करणे या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो.
१. पॉझिटिव्ह पॅरेंटिंगमुळे मुलांचा योग्य मानसिक विकास होतो. २. मुले शाळेत आणि इतर उपक्रमांमध्ये चांगली कामगिरी करतात.३. मुले चिडखोर, चिडचिडी किंवा हट्टी होत नाहीत. ४. मुलांचा आत्मविश्वास वाढतो, जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही दिसून येतो.५. अभ्यासाबरोबरच इतर कामांमध्येही मुलांची आवड निर्माण होते.
पॉझिटिव्ह पॅरेंटिंग करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवा ...
१. आपल्या मुलांना चांगले बनवण्यासाठी, बहुतेक पालक त्यांच्या कमतरता आणि वाईट सवयी सुधारण्यात व्यस्त असतात, ज्यामुळे मुले मनापासून व्यक्त होत नाहीत. यामुळे मुलांचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो. चुका सुधारण्यासोबतच मुलांच्या चांगल्या कामाचे कौतुकही करावे लागते.
२. मुलांनी एखादी चूक केली की ज्यामुळे कोणतीही मोठी हानी होणार नाही, तरीही त्याला ओरडण्या ऐवजी शांतपणे समजावून सांगा.
३. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी थोडा वेळ मुलांना द्या. मोबाईल, टिव्ही दूर ठेवून मुलांशी खेळा, गप्पा मारा, त्यांना समजून घ्या.
४. मुलांवर काहीही लादण्याऐवजी त्यांच्या इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न करा.
५. लहान मुलांच्या बाबतीत खूप कडकपणा, रागीटपणा टाळा. पालकांचा अतिशय रागीटपणा व कडकपणा मुलांच्या विकासात अडथळा बनू शकतो.
६. मुलांच्या कमतरतेवर लक्ष ठेवण्यासोबतच त्यांच्या बलस्थानांकडेही लक्ष द्या.