मुलांचे संगोपन (Child Care) करणे हे खरंच सोपं काम नाही (Parenting Tips). मुलांच्या वाढत्या वयानुसार संगोपनातही बदल करणं गरजेचं आहे. आईनेच मुलांचे संगोपन करावे अशी आजवरची रीत असली तरी नव्या काळात आईबाबा दोघांनी मुलांची काळजी घेणं, त्यांच्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे (Indra Nooyi).
पण अजूनही नोकरी करणाऱ्या आईलाच गिल्ट दिला जातो की तू नोकरी करतेस, बाहेर जातेस तर मुलांना वेळ कोण देणार? त्यामुळे आईच्या मनात अपराधीपणाची भावनाही मनात येते. पण असा गिल्ट बाजूला ठेवून काय करता येईल याविषयी सांगतात पेप्सिको कंपनीच्या माजी सीईओ इंद्रा नूयी(Positive Parenting Tips For Working Moms).
स्वतःकडे लक्ष द्या
जर आपण वर्किंग वूमन असाल तर, कामाचा लोडही असतोच. शिवाय घर आणि मुलांकडेही तितकेच लक्ष द्यावे लागते. आई होण्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही स्वतःला विसरा. आपण स्वत:साठीही वेळ काढला पाहिजे. तरच आपण आनंदी राहू.
भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल
मुलांसोबत काम
मुलांना कमी वेळ देता येतो म्हणून कुढत न बसता आपल्या रोजच्या कामात मुलांना सहभागी करुन घ्या. त्यांच्याशी गप्पा मारा, जेव्हा शशक्य असेल तेव्हा खेळा. मुलांसोबत असाल तेव्हा त्यांना पूर्ण वेळ द्या.
कामाची वाटणी करा
संगोपनामध्ये फक्त आई नसून, वडिलांचीही तितकीच जबाबदारी असते. नूयी म्हणते, जोडीदारांमध्ये परस्पर समंजसपणा असणे खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही त्यांना समान जबाबदारी दिली पाहिजे. काही कामं मुलांच्या बाबांनाही करु द्या.
चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल
मुलं लहान असताना मुलांनीही वडिलांना वेळ द्यायला हवा. आईबाबा दोघं सोबत असतील तर मुलं जास्त आनंदी असतात. मुलांसोबत एकत्र ॲक्टिव्हिटी करा. खेळा. त्यातून मुलांनाही सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आपणच सुपरवूमन होण्याचा प्रयत्न करु नका. त्यापेक्षा कामं वाटून दिली तर तुम्हाला मुलांसाठी जास्त वेळ देता येईल. त्यामुळे नियोजन आणि वाटणी हे विसरु नका.