अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि फक्त भारतातच नाही, जर जगभरात ओळखली जाते. तिच्या अभिनयामुळे तिने हॉलीवूडमध्येही तिचे स्थान निर्माण केले असून आज ती एक इंटरनॅशनल सेलिब्रिटी आहे. आज प्रियांकाने उत्तुंग झेप घेत स्वत:चं जबरदस्त अस्तित्व निर्माण केलं आहे. पण असं असलं तरी तिच्या लहानपणी तिला घडविताना आई म्हणून मी अनेक ठिकाणी चुकले. त्या चुकांचा मला आजही पश्चाताप होतो, पण प्रियांकाने मात्र मला त्या चुकांसाठी कधीच दोष दिला नाही... अशा शब्दांत प्रियांकाच्या आई डॉ. मधू चोप्रा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. (Priyanka Chopra's mother shares mistakes she made while raising Priyanka Chopra)
Bollywood Hungama यांना दिलेल्या मुलाखतीत डॉ. मधू यांनी त्यांच्याकडून प्रियांकाच्या बाबतीत नेमक्या कोणत्या चुका झाल्या ते सांगितले.
महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा, मसाला म्हणूनही भाज्यांमध्ये टाका- जेवणाची वाढेल रंगत
त्या म्हणाल्या की ४- ५ वर्षांची असताना प्रियांका एकदा तिच्या वडिलांशी चुकीच्या शब्दांत बोलली होती. तिचं बोलणं थोडं बारकाईने ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की याच शब्दांत मी प्रियांकाला उत्तर दिलं होतं आणि ते तिने तिच्या वडिलांसाठी वापरलं. यावेळी एक आई म्हणून मी माझं बोलणं सुधारायला हवं, हे माझ्या लक्षात आलं.
वयाच्या ७ व्या वर्षी प्रियांकाच्या वडिलांची आणि इतर कुटूंबियांची कोणतीही परवानगी न घेता मधू यांनी प्रियांकाला थेट बोर्डिंग स्कूलमध्ये धाडलं. त्यांच्या त्या निर्णयाचाही त्यांना आज पश्चाताप होत आहे.
थंडीत घरात घालण्यासाठी आकर्षक चपला घ्यायच्या? बघा ३ ट्रेण्डी पर्याय- घरातही राहा एकदम स्टाईलमध्ये...
त्या म्हणाल्या की त्यानंतर प्रियांका टीन एजर असताना त्यांनी तिला परदेशात शिक्षणासाठी पाठवलं होतं. त्या वयात तिला खरंतर तिच्या आई- वडिलांची गरज होती. पण ते तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही. मलाही तिची खूप आठवण यायची.
पण आतासारखी मोबाईल- इंटरनेट सुविधा तेव्हा नव्हती. तेव्हा ती खूप एकटी पडली होती. कारण तेव्हा आम्ही १० दिवसांतून एकदाच बोलायचो आणि ते ही काही मिनिटांसाठी.
हिवाळ्यात त्वचेला द्या केशर- बदामाचं पोषण! त्वचा होईल मऊ- चमकदार, करून पाहा १ सोपा उपाय
पालकांनी या वयात मुलांसोबत प्रत्येक क्षणी असलं पाहिजे, हे मला आज कळतंय असं मधू म्हणाल्या. एक पालक म्हणून आपणही आपल्या मुलांच्या बाबतीत चुकतोय का, याचा विचार यानिमित्ताने प्रत्येकानेच करायला पाहिजे. नाही का?