उत्तम आरोग्यासाठी आहारात नियमितपणे प्रोटीन्स घेणे आवश्यक असते. लहान मुलांची शारीरिक, बौद्धिक वाढ चांगली व्हावी यासाठी त्यांच्या आहारात प्रोटीनचे प्रमाण जास्त असायला हवे. हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंची ताकद वाढण्यासाठी, शरीराची ताकद भरुन येण्यासाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. साधारणपणे प्रोटीन म्हणजे मांसाहार असा आपला समज असतो. पण शाकाहारातही प्रोटीनचे बरेच पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही मांसाहार करत नसाल तरी हरकत नाही. शाकाहारात असे कोणते पर्याय आहेत जे आपण मुलांना देऊ शकतो ते पाहूया...
कोणत्या वयासाठी किती प्रोटीन गरजेचं...
१ ते ३ वर्षाच्या मुलांना दररोज १३ ग्रॅम पनीर गरजेचं असतं. तर ४ ते ८ वर्षाच्या मुलांना १९ ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. लहान मुलांची चांगली वाढ व्हावी यासाठी त्यांना योग्य त्या प्रमाणात प्रोटीन द्यायलाच हवं. शरीराच्या विविध कार्यासाठी आवश्यक असणारं प्रोटीन आहारातून मिळते. हार्मोन्सची वाढ, हाडांची ताकद, वजन, नखं आणि केसांची वाढ अशा सगळ्या गोष्टींसाठी प्रोटीन गरजेचं असतं. अंडी आणि मांस यांमध्ये जास्त प्रोटीन असते. हे खरे असले तरी शाकाहारी असणाऱ्यांना प्रोटीनसाठी आहारात कोणते पदार्थ घेता येऊ शकतात याविषयी...
प्रोटीनसाठी शाकाहारी पर्याय काय..
१. टोफू
२. सोयाबिन
३. पनीर
४. राजमा
५. चीज
६. दही
७. ब्रोकोली
८. दाणे, बदाम, काजू
९. ओटस
१०. चिया सीडस