बोटावर मोजण्याइतके काही लोक सोडले तर आजही अशाच विचाराचे लोक अधिक आहेत की त्यांच्यामते मुलांच्या संगोपनासाठी आईने तिचं करिअर सोडलं पाहिजे किंवा आईने तिच्या करिअरमध्ये थोडा ब्रेक घेतला पाहिजे. हल्ली बाळंतपणानंतर आईला जशी ६ महिन्यांची मातृत्व रजा मिळते, तशीच रजा वडिलांनाही मिळते. पण त्यानंतर मात्र वडिलांनी पुन्हा बाळासाठी करिअरमध्ये ब्रेक घ्यावा, असा विचार कोणी करत नाही. पण रणबीर कपूरने (Ranbir Kapoor is taking break for his daughter Raha) मात्र हा विचार केलाय आणि त्याच्या लेकीसाठी म्हणजेच राहासाठी तो आता बॉलीवूडमधून ६ महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. त्याच्या या निर्णयाचं खूप जबरदस्त स्वागत त्याच्या चाहत्यांकडून आणि विशेषत: महिलांकडून होत आहे.
अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर यांची लेक राहा आता नुकतीच एका वर्षाची होणार आहे. रणबीरचे त्याच्या चाहत्यांसोबत नुकतचे एक झूम मिटिंग सेशन झाले.
देवाला वाहिलेली झेंडूची फुलं फेकू नका, सुकलेल्या फुलांचे २ भन्नाट उपयोग- त्वचा होईल सुंदर- मऊ
या मिटिंगदरम्यान त्याने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी बोलताना तो म्हणाला की पुढच्या काही दिवसांमध्ये तो त्याच्या मुलीवर फोकस करणार आहे. कारण तिच्या जन्मापासूनच तो वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये बिझी होता. त्यामुळे आतापर्यंत त्याला राहासाठी पाहिजे तेवढा वेळ देता आलेला नाही. पण आता ती अधिक खेळकर झाली असून 'मा', 'पा..' असे एकेक शब्द उच्चारू लागली आहे. त्यामुळे हा अगदी परफेक्ट वेळ असून तो आता पुर्णवेळ राहासोबत राहणार असून आलिया तिच्या 'जिगरा' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी राहणार आहे.
बायको काम करणार आणि नवरा करिअरमध्ये ब्रेक घेऊन मुलं सांभाळणार हे अजूनही आपण 'की ॲण्ड का' सारख्याच चित्रपटातून पाहतो. नवऱ्याने घर सांभाळून मुलांकडे लक्ष देणं हे आजही कमीपणाचं मानलं जातं.
कॅल्शियमचा सुपर डोस असणारे ७ पदार्थ, दूध-पनीर-चीज न खाताही मिळेल भरपूर कॅल्शियम
पण असं असूनही रणबीर मात्र मुलीची गरज ओळखून तिला सांभाळणार तर आहेच शिवाय आलियाने तिच्या कामात व्यस्त असणंही त्याने मान्य केलं आहे. यातच नवरा म्हणून आणि पिता म्हणून त्याच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.