Join us  

ते दोघे भांडत आणि मी पायऱ्यांवर..! रणवीर कपूर सांगतो अजूनही कुणी आरडाओरडा केला तर मला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 4:58 PM

Ranbir Kapoor Reveals About His Parents Rishi Kapoor And Neetu Kapoor: आई- वडिलांचं एकमेकांशी कसं नातं आहे आणि त्याचा मुलांच्या मनावर कसा परिणाम होत जातो, हे सांगणारं एक उत्तम उदाहरण म्हणजे रणबीर कपूरने सांगितलेला किस्सा..

ठळक मुद्देआज रणबीर स्वत: एका मुलीचा बाप आहे. पण तरीही अजूनही लहानपणी मनावर झालेले हे आघात तो विसरू शकलेला नाही.

लहान मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्याची पहिली सुरुवात ही त्यांच्या कुटूंबातूनच होत असते. कुटूंबातून त्यांना जसं वातावरण मिळतं, तसं ते घडत जातात. यातही आई आणि वडील हे असे दोन व्यक्ती आहेत ज्यांचा मुलांवर सगळ्यात जास्त प्रभाव असतो. त्यांचे एकमेकांशी कसे नाते आहेत, ते एकमेकांशी कसे बोलतात- वागतात या गोष्टी नकळतपणे मुलांच्या मनावर कायमच्या कोरल्या जातात. अशीच स्वत:च्या आई- वडिलांची म्हणजेच नितू कपूर आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor And Neetu Kapoor) यांची एक गोष्ट त्यांचा मुलगा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अजूनही विसरू शकत नाही. त्या गोष्टीचा त्याच्या मनावर अतिशय वाईट पद्धतीने  परिणाम झाला आहे. ती गोष्ट  नेमकी कोणती ते पाहा...(Ranbir Kapoor reveals he spent his childhood on the staircase hearing his parents loud noise of fighting)

 

उद्योजक निखिल कामत यांनी रणबीर कपूरची नुकतीच एक मुलाखत घेतली. यामध्ये त्याला त्याच्या लहानपणाविषयीचे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर कपूर म्हणतो की आमच्या कुटूंबात असा एक बॅड पॅच आला होता तेव्हा माझ्या आई- बाबांचं एकमेकांशी अजिबात पटायचं नाही.

मासिक पाळीविषयी आपल्या लेकीला कधी आणि कशी माहिती द्यावी? पाळीची भीती वाटू नये म्हणून... 

ते खूप भांडायचे. मोठमोठाल्या आवाजात बोलायचे. वाद घालायचे. त्यांची ती भांडणं बंद दरवाज्याआड असली तरी त्याचा आवाज एवढा मोठा असायचा की तो माझ्यापर्यंत यायचाच. त्यावेळी मोठी बहिणी रिधिमा परदेशात शिकायला गेलेली होती. त्यामुळे त्यांची भांडणं सुरू झाली की ते आवाज ऐकत अस्वस्थ होऊन मी एकटाच जिन्याच्या पायऱ्यांवर तासनतास बसलेलो असायचो.

 

रणबीर सांगतो की त्या गोष्टीचा, त्यांच्या त्या आरडाओरडा करण्याच्या सवयीचा माझ्यावर इतका वाईट परिणाम झाला आहे की त्यामुळे आजही मोठ्याने बोलण्याचा, आरडाओरडा करण्याचा आवाज ऐकला की मी घाबरतो, खूप अस्वस्थ होतो.

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय

आज रणबीर स्वत: एका मुलीचा बाप आहे. पण तरीही अजूनही लहानपणी मनावर झालेले हे आघात तो विसरू शकलेला नाही. बालमन अतिशय कोवळं, हळवं असतं. त्यामुळे पालकांकडून ते अतिशय नाजूकपणे सांभाळलं गेलं पाहिजे, हेच रणबीरने सांगितलेल्या त्याच्या अनुभवातून लक्षात येतं.

 

टॅग्स :पालकत्वरणबीर कपूरऋषी कपूर