उन्हाळी सुटी संपून मुलांच्या शाळा सुरू झाल्या आणि त्यांच्या पालकांनी हुश्श.. केलं. मुलांनी घरभर धुमाकूळ घालून अक्षरश: नाकी नऊ आणले होते अशी बहुसंख्य पालकांची तक्रार आहे. मुलांची उन्हाळी सुटी पालकांसाठी डोकेदुखी ठरण्याचं एकमेव कारण म्हणजे मुलांची खूप जास्त चंचलता. हल्ली बरीच मुलं खूप चंचल आहेत. यालाच आपण हायपर ॲक्टीव्ह असंही म्हणतो. या मुलांमध्ये एवढी एनर्जी असते की ते क्षणभरही एकाजागी स्वस्थपणे बसत नाहीत. त्यांची सतत काहीतरी धावपळ, पळापळ, धिंगाणा चालू असतो (reasons for hyper activeness in child). त्यांच्यातल्या या अस्वस्थतेचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही होतो. अभ्यासासाठीही ते शांतपणे बसत नाहीत (how to calm hyper active child). कारण त्यांच्यामध्ये एकाग्रताच नसते. मुलं असं का करतात, बघा तज्ज्ञांनी सांगितलेली त्यामागची कारणं....(reasons for hyper activeness in child)
मुलं हायपरॲक्टीव्ह होण्यामागची कारणं
१. मोबाईल आणि टीव्ही
हल्लीची बहुतांश मुले त्यांचा अधिकाधिक वेळ टीव्ही आणि मोबाईल बघण्यात घालवतात. बऱ्याच मुलांना खेळायला समवयस्क मुलं नसतात.
राधिका मर्चंटच्या विंटेज ड्रेसपेक्षा सातपट महाग आहे तिची पर्स, बघा या दोन्ही वस्तूंची खासियत....
त्यामुळे वेळ घालविण्यासाठी स्क्रिन टायमिंगचा अतिरेक होतो. मैदानी खेळ तर ते खेळतच नाहीत. त्यामुळे त्यांच्यातली उर्जा बाहेर पडत नाही. यामुळे मग इतरवेळी ते खूप जास्त ॲक्टीव्ह झालेले असतात.
२. पालकांच्या अपेक्षा
पालकांच्या मुलांकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. अभ्यासात तर मुलांनी हुशार असावंच, पण चारचौघांत त्यांचं वागणं, बोलणंही उत्तम असावं.
बिर्याणीच्या नावाखाली भलताच गोंधळ, आंब्याचा रस घालून केलेली आमरस बिर्याणी पाहून नेटिझन्स म्हणाले....
त्यांनी वेगवेगळ्या छंदांमध्ये प्रगती करावी, अशा अवाजवी अपेक्षा बऱ्याच पालकांची असते. पालकांना मुलांकडून खूप जास्त गोष्टी पाहिजे असतात. याचा मुलांवर परिणाम होऊन ते जास्त चंचल होतात.
चंचलता कमी करून मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी उपाय
१. मुलांचा स्क्रिन टाईम बऱ्याच प्रमाणात कमी करा. जास्तीतजास्त अर्ध्या तासापर्यंत तो मर्यादित ठेवा.
केमिकल्स असणारं विकतचं मेयोनिज खाण्यापेक्षा १० मिनिटांत घरीच तयार करा भरपूर प्रोटीन्स देणारं मेयोनिज
२. मुलांना मैदानी खेळ खेळायला लावा. किंवा क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, स्विमिंग असे काही व्यायाम होणारे क्लास त्यांना लावा.
३. मुलांना नेहमी घरचं सात्विक अन्न द्या. बाहेरचे, पॅकेटबंद पदार्थ देणं टाळा. त्यातल्या घटकांचाही मुलांच्या चंचलतेवर परिणाम होत असतो.