Lokmat Sakhi >Parenting > बाळाला बाटलीने दूध पाजताय? डॉक्टर सांगतात, बाटलीची सवय चुकीची आणि धोक्याची कारण...

बाळाला बाटलीने दूध पाजताय? डॉक्टर सांगतात, बाटलीची सवय चुकीची आणि धोक्याची कारण...

Risk In Bottle Feeding Parenting Tips : डॉक्टर बाटलीने दूध पाजण्याच्या विरोधात का असतात यामागील तथ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 09:40 AM2023-07-10T09:40:04+5:302023-07-10T09:45:02+5:30

Risk In Bottle Feeding Parenting Tips : डॉक्टर बाटलीने दूध पाजण्याच्या विरोधात का असतात यामागील तथ्य

Risk In Bottle Feeding Parenting Tips : Bottle feeding baby? Doctors say bottle habit is wrong and dangerous... | बाळाला बाटलीने दूध पाजताय? डॉक्टर सांगतात, बाटलीची सवय चुकीची आणि धोक्याची कारण...

बाळाला बाटलीने दूध पाजताय? डॉक्टर सांगतात, बाटलीची सवय चुकीची आणि धोक्याची कारण...

बाळ जन्माला येतं तसं आपण त्याला स्तनपान सुरू करतो. स्तनपान केल्याने आई आणि बाळ दोघांची तब्येत चांगली राहते. हे जरी खरे असले तरी साधारण ६ ते ८ महिन्यात आजकाल महिलांना नोकरीवर रुजू व्हावे लागते. नोकरीला बाहेर जायचे म्हणजे साधारण ८ ते ९ तासांसाठी बाहेर राहावे लागणार असते. अशात बाळाला वरचे अन्न सुरू केले नसेल तर त्याच्या आहाराचे काय असा मोठा प्रश्न बऱ्याच मातांसमोर असतो. अशा महिला आपल्या बाळाला एकतर पाळणाघरात ठेवतात किंवा घरात सासूसासरे, आईवडील यांच्याकडे ठेवतात (Risk In Bottle Feeding Parenting Tips). 

अशावेळी बाळाला नकळत बाटलीची सवय लावली जाते. बाटलीने दूध पाजणे याला डॉक्टर कधीच संमती देत नाहीत. याची महत्त्वाची काही कारणे आहेत. इन्स्टाग्रामवर बच्चों की डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ माधवी भारद्वाज अशीच काही महत्त्वाची कारणे आपल्याशी शेअर करतात. डॉक्टर बाटलीने दूध पाजण्याच्या विरोधात का असतात यामागील तथ्य त्या आपल्याला  अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगतात. पाहूयात ही कारणे कोणती आणि त्याने बाळाच्या आरोग्यावर नेमका काय परीणाम होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

इन्फेक्शन होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण...

बाटलीने दूध पिणे हे इन्फेक्शन होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे प्लास्टीकच्या बाटल्या वापरण्यापेक्षा काचेच्या बाटल्या वापरायला हव्यात. बाटली वापरण्यापूर्वी ती साधारणपणे १० मिनीटे गरम पाण्यात चांगला उकळून घ्यायची किंवा स्टरलाईज करायचा असते. हे जरी ठिक असले तरी ही बाटली नेमकी बदलायची कधी? तर प्लास्टीकची बाटली दर ४ ते ६ महिन्यांनी बदलायला हवी.


ठराविक काळाने बाटलीचा रंग बदलायला लागतो, त्यावेळी बाटली बदलायची वेळ आली आहे हे लक्षात घ्यायला हवे. बाळाला कोणते इन्फेक्शन झाल्यास डॉक्टरही लगेचच बाटली बदलण्याचा सल्ला देतात. तो पालकांनी गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा बाळाच्या तब्येतीवर त्याचा वाईट परीणाम होतो हे लक्षात घ्यायला हवे. 

Web Title: Risk In Bottle Feeding Parenting Tips : Bottle feeding baby? Doctors say bottle habit is wrong and dangerous...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.