Join us  

मुलं यशस्वी झालेली पाहायची आहेत? घरात मुलांसमोर ५ गोष्टी अजिबात करु नका, सद्गगुरूंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:04 PM

Sadhguru Jaggi Vasudev Parenting Tips : सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. काही गोष्टी जर घरापासूनच मुलांना मिळाल्या नाहीत तर मुलं सकारात्मक वातारवणात राहतील.

आपल्या मुलांनी भविष्यात चांगलं नाव कमवावं, यशस्वी व्हावं असं प्रत्येक पालकांना वाटतं.  मुलांच्या चांगल्या भवित्व्यासाठी आई वडील नेहमीच प्रयत्नरत असतात. (Parenting Tips) मुलांची जडण-घडण कशी होते ते घरातल्या वातावरणावर अवलंबून असते. घरातलं वातावरण खराब होणार नाही याची आई वडिलांनी पुरेपूर काळजी घ्यायली हवी. (Sadhguru Jaggi Vasudev Parenting Tips Things To Never Show Children At Home Parents Should Know) अशाकाही गोष्टी आहेत ज्या मुलांसमोर बोलणं पालकांनी पूर्णपणे टाळायला हवं. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. काही गोष्टी जर घरापासूनच मुलांना मिळाल्या नाहीत तर मुलं सकारात्मक वातारवणात राहतील. (Sadhguru Jaggi Vasudev Parenting Tips)

1) रागाचं वातावरण

मुलांना कधीच रागाचं वातारण आवडत नाही. कारण जर तुम्ही  रागवलात तर मुलंसुद्धा चिडचिड करतात. मुलांना आवडेल असं खेळीमेळीचं वातावरण घरात ठेवा. मुलांना कधीच अपशब्द वापरू नका. यामुळे मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होतो. पालकांचे बघून मुलंसुद्धा मोठ्याने बोलतात आणि आरडाओरड करण्याची सवय लागते.

2) ताण-तणाव

लहान मुलांचे मन नाजूक असते. आपल्या घरातील भांडणांचा किंवा इतर कार्यालयीनी गोष्टींचा तुम्हाला ताण जाणवत असेल तर याचा परिणाम कधीच मुलांवर होऊ देऊ नका. कारण यामुळे मुलं सतत तणावाखाली राहतात.

3) नेहमी आनंदी राहा

घरातील वातावरण आनंदी असेल तर अनेक प्रकारचे त्रास दूर होऊ शकतात.  घरात सकारात्मक वातावरण राहतं ज्यामुळे मुलं कधीच नकारात्मक गोष्टींकडे वळत नाहीत पण जर घरात आनंदाचे वातावरण नसेल घरात जर खूपच भांडण तंटे होत असतील तर काहीही केल्यास मुलांचे आरोग्य चांगले राहू शकणार नाही. 

भाजलेले की शिजवलेले? कोणते चणे खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात-समजून घ्या

4) सन्मान करा

मुलांनी तुमच्याशी नीट बोलावं, तुमच्यावर प्रेम करावं असं तुम्हाला वाटत असेल तर  तुम्हीसुद्धा त्यांच्याशी प्रेमाने वागा. कारण तुम्ही जसं वागाल तसंच मुलं तुमच्याशी वागतील. मुलांना आदरपूर्वक वागणूक द्या. फक्त मोठ्यांनाच नाही तर लहानांना पण मान-सन्मान द्यावा. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीशी पण आदराने बोलावे अशी समज द्या.

पोट-कंबर खूपच सुटलं? १ चिमूटभर 'ही' घरगुती पावडर खा, झरझर होईल वजन कमी

5) स्वीकार करा

तुम्ही जसे आहात स्वत:ला स्विकारा आणि मुलांनाही तशीच सवय लावा.  मुलांनी जर जसं आहे तसं त्यांना स्विकारलं तर ते आयुष्यात येणारी आव्हानं सहज स्विकारतील आणि आनंदाने जगतील. मुलांना नेहमी पूजा-पाठ, श्लोक  म्हणणं अशा चांगल्या सवयी लावा. जेणेकरून त्यांना सकारात्मक एनर्जी मिळेल. मुलांना नास्तिक राहायला शिकवू नका. यामुळे त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होईल.

टॅग्स :जग्गी वासुदेवपालकत्व