Lokmat Sakhi >Parenting > मुलांचं आयुष्यभराचं नुकसान करतात पालकांच्या ५ चुका, पालक सुधारले नाहीतर मुलं बिघडतात कारण..

मुलांचं आयुष्यभराचं नुकसान करतात पालकांच्या ५ चुका, पालक सुधारले नाहीतर मुलं बिघडतात कारण..

Parenting Tips Raise Yourself Before You Raise Your Kids : मुलांना संस्कार देताना आई-वडीलांकडून चुका झाल्या तरी मुलांचे मानसिक आरोग्य खराब होऊ शकते.  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 04:43 PM2024-07-26T16:43:48+5:302024-07-27T15:12:13+5:30

Parenting Tips Raise Yourself Before You Raise Your Kids : मुलांना संस्कार देताना आई-वडीलांकडून चुका झाल्या तरी मुलांचे मानसिक आरोग्य खराब होऊ शकते.  

Sadhguru Point For Raising Ambitious Child : Parenting Tips Raise Yourself Before You Raise Your Kids | मुलांचं आयुष्यभराचं नुकसान करतात पालकांच्या ५ चुका, पालक सुधारले नाहीतर मुलं बिघडतात कारण..

मुलांचं आयुष्यभराचं नुकसान करतात पालकांच्या ५ चुका, पालक सुधारले नाहीतर मुलं बिघडतात कारण..

मुलांचे पालन पोषण करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. जे कपल्स पालक बनले असतील हे या गोष्टीची सहमत असतील.(Parenting Tips in Marathi)  मुलांना संस्कार देताना आई-वडीलांकडून थोड्या जरी चुका झाल्या तरी मुलांचे मानसिक आरोग्य आणि त्यांचे भविष्य खराब होऊ शकते.  पालक मुलांच्या पालनपोषणात कमी पडू नये यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी खास टिप्स सांगितल्या आहेत. (Parenting Tips Raise Yourself Before You Raise Your Kids)

सद्गुरूंनी आपल्या एका भाषणात सांगितले की आई वडिलांनी आपली स्वप्न आणि महत्वकांक्षा मुलांवर थोपवू नये. मुलांना या जगात आणण्यासाठी पालक एक माध्यम आहेत. मुलांची काळजी घेताना आणि त्यांचे संगोपन करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (Parenting Tips By Sadguru Jaggi Vasudev)

वातावरण आनंदी नसणं

सद्गुरू सांगतात की आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी चांगले वातावरण ठेवायला हवे. त्यांच्यासमोर कधीही राग करू नये, दुखी राहू  नये, ओरडू नये तसंच आक्रोश करू नये. मुलांना आनंदी आणि सुखी वातावरण खूप आवडते.  आपल्या मुलांचे पालनपोषण करण्यासाठी चांगले वातावरण असणं फार गरजेचं आहे.


मुलांना जहागीर समजू नका

सद्गुरू यांच्या म्हणण्यानुसार पालकांनी आपल्या मुलांना जहागीर समजून त्यांच्यावर आपल्या इच्छा त्यांच्यावर थोपवू नये.  त्यांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांची आवड-निवड महत्वाकांक्षा समजून घ्या. आई वडिलांच्या सपोर्टमुळे त्यांच्याच आत्मविश्वास खूप वाढतो. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना मोटिव्हेट करत राहा.

पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल

अपयशाबद्दलही शिकवा

मुलांना फक्त यशाबद्दल नाही तर त्यांच्या अपयशाबद्दलही शिकवा. मुलं फेल झाल्यानंतर  हताश होतात. आयुष्यात सर्व संपलंय असं त्यांना वाटू लागतं. म्हणूनच मुलांना मोटिव्हेट करा. अपयशाचा सामना करून पुन्हा कसं उभं राहायचं ते मुलांना शिकवा. 

रिएलॅस्टिक गोल्स तयार करा

आपल्या मुलांना वयाच्या हिशोबानं शिकवा. त्यांना असा टास्क द्या जे ते सहज पूर्ण करू शकतील. त्यांना मोटिव्हेशन मिळेल आणि पुढे जाण्याची ताकद मिळेल. ही ट्रिक आई-वडील वापरू शकतात आणि मुलं कॉन्फिडेंट राहतात. हार मानत नाहीत. 

दिवसेंदिवस नजर कमजोर होतेय-लांबच दिसत नाही? ५ गोष्टी करा, नजर होईल तेज

मुलांचे रोल मॉडेल बना

जर तुम्हाला आपल्या मुलांना महत्वाकांक्षी बनवायचं असेल तर तुम्ही स्व:त मुलांचे रोल मॉडेल बनू शकता. आपल्या मुलांने चांगले वागावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्यापासून सुरूवात करा. तुम्ही जसे वागाल तसेच तुमची मुलं वागतील.

Web Title: Sadhguru Point For Raising Ambitious Child : Parenting Tips Raise Yourself Before You Raise Your Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.