फ्लॉवर समझे क्या फायर है हम फेम पुष्पा म्हणजे खरे तर अल्लू अर्जुन. त्याची लेक अरहा सध्या चर्चेत आहे. आणि तिचे कौतुक केले आहे ते प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने. आपली मुले फाडफाड इंग्रजी बोलली पाहिजे असे वाटणाऱ्या पालकांसाठी खरे तर हा एक खास धडा आहे. लवकरच समंथाचा शाकुंतलम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून याची मुलगी अरहा ही समंथासोबत शाकुंतलम चित्रपटात महत्त्वाची भूमिका करतेआहे. अरहाच्या कामाचं कौतुक तर समंथाने केलच. पण एका महत्त्वाच्या विषयावरही भाष्य केले. (Samantha Ruth Prabhu on Allu Arah daughter of Allu Arjun language Shakuntalam).
वयाच्या सहाव्या वर्षी अरहाने आपले अभिनय करीयर सुरू केले. समंथासोबतच देव मोहन याचीही शाकुंतलममध्ये प्रमुख भूमिका असले. देवी शकुंतलाचा मुलगा भरत याची भूमिका अल्लू अरहा हिने साकारली आहे. समंथा म्हणाली, अरहामध्ये सुपरस्टार होण्याचे कॅलिबर आहे, तिचा आत्मविश्वासही कमालीचा आहे. विशेष म्हणजे अरहा हिंदी किंवा इंग्रजी अजिबात बोलत नाही. ती फक्त तेलगू बोलते. तेलगू इतकी छान बोलते की भले भले पण तिच्यासमोर फिके पडतील. आपली मातृभाषा आपल्याला चांगली येणं हे सर्वात महत्त्वाचं आहे, मुले पुढे इंग्रजी आणि अन्य भाषा शिकणारच आहे.
अरहाच्या पालकांनी तिच्या भाषेसाठी विशेष कष्ट घेतल्याने अल्लू अर्जून आणि अल्लू स्नेहा रेड्डी यांचे समंथाने खास कौतुक केले. अरहा ब्रिलियंट मुलही असून ती स्वत:चा मार्ग स्वत: निवडेल, त्यासाठी तिला तिच्या वडिलांचीही गरज लागणार नाही. शुटींगच्या दुसऱ्या दिवसापासूनच ती सकाळी ९ ते रात्री ९ असे १२ तास आमच्यासोबत शुटींग करायची. तिचे चित्रपटातील डायलॉग मोठे असूनही ती न घाबरता सेटवरच्या २०० लोकांसमोर त्याचे उत्तम सादरीकरण करायची असे सांगत समंथाने अरहाचे कौतुक केले. गुणशेखर निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. मातृभाषेवर प्रेम आणि उत्तम काम हे यातले सूत्र म्हणावे लागेल.