Lokmat Sakhi >Parenting > आई झाल्यावर करिअर संपते का? मग तुम्ही काय निवडाल? - समीरा रेड्डीचा सवाल...

आई झाल्यावर करिअर संपते का? मग तुम्ही काय निवडाल? - समीरा रेड्डीचा सवाल...

Sameera Reddy pens a note on career post motherhood: ‘How can one balance it all?’ : मातृत्व आणि करिअर यांच्यातला समतोल नेमका कसा राखावा, समीरा रेड्डीने केला नवमातांना सवाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2023 07:56 PM2023-06-07T19:56:33+5:302023-06-07T19:58:55+5:30

Sameera Reddy pens a note on career post motherhood: ‘How can one balance it all?’ : मातृत्व आणि करिअर यांच्यातला समतोल नेमका कसा राखावा, समीरा रेड्डीने केला नवमातांना सवाल...

Sameera Reddy pens a note on career post motherhood: ‘How can one balance it all?’ | आई झाल्यावर करिअर संपते का? मग तुम्ही काय निवडाल? - समीरा रेड्डीचा सवाल...

आई झाल्यावर करिअर संपते का? मग तुम्ही काय निवडाल? - समीरा रेड्डीचा सवाल...

'आई होणं' हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण असतो. प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यातील आई होण्याच्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत असते. आई होण्यासोबतच येणारे मातृत्व तिच्यासाठी अनेक जबाबदाऱ्या एकत्रित घेऊन येतात. सध्याच्या काळात प्रत्येक स्त्री ही वर्किंग वुमन असतेच, ती तिचे स्वतःचे करिअर करण्याच्या जबाबदारीत देखील तितकीच गुंतलेली असते. स्वतःचे करिअर घडवत असताना आई होण्याचा निर्णय घेणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टास्कच म्हणावा लागेल. आजच्या काळात काही महिला चूल - मूल या साचेबद्द चौकटीला जुगारून मातृत्व आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच जबाबदारीने पूर्ण करतात.   

बॉलिवूड मधील काही अभिनेत्रींनी नुकताच आई होण्याचा अनुभव घेतला आहे. बहुतेक सर्वच अभिनेत्री, झगमगत्या चित्रपट सृष्टीतील ‘ग्लॅमरस’ करिअरला ब्रेक देऊन मातृत्वाचा अनुभव आणि आनंद घेताना दिसतात. तर काही अभिनेत्री प्रेग्नंन्सी नंतर अगदी ६ महिन्यातच आपले वजन कमी करुन पुन्हा कामाला सुरुवात करतात. दोन मुलांची आई असलेल्या समीरा रेड्डीने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मातृत्व आणि करिअर यात नेमके संतुलन कसे राखावे ? असा प्रश्न विचारत चर्चा करण्याचे आवाहन केले आहे(Sameera Reddy pens a note on career post motherhood: ‘How can one balance it all?’).

मातृत्व स्वीकारलेली समीरा म्हणते... 

समीराने आपल्या इंस्टाग्राम पोस्टची सुरुवातच एका प्रश्नाने केली आहे, करिअर आणि मातृत्व हे दोन्ही एकाच वेळी मिळू शकते का ? असा तो प्रश्न आहे. प्रेग्नंन्सी नंतर अनेकांनी मला आता चित्रपटांत परत काम करायला कधी सुरुवात करणार किंवा परत करिअर सुरु कारणांर का ? असे अनेक प्रश्न विचारले. मला करिअर करण्यासाठी समोर अनेक संधी आहेत, परंतु मातृत्वाची ही जबाबदारी स्वीकारून करियर करण्यासाठी पुन्हा एक पाऊल पुढे टाकण्याचे अजूनही माझे धाडस होत नाही.... एखादी एकटी स्त्री या दोन्ही जबाबदाऱ्यांचा समतोल राखू शकते का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

आलिया भट म्हणते, लेकीला छातीशी घट्ट धरलं आणि तिनं माझ्या चेहऱ्यावरुन हात फिरवला, तेव्हा वाटलं...

मला काही सिध्द करायचं नाही, नको कसलं प्रमाणपत्र! अनुष्का शर्माचा लेकीसाठी मोठा निर्णय...

समीराने आपला मुलगा व मुलगी यांच्यासोबतचे काही गोड फोटोज पोस्ट करत, तिने इतर मातांना त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि लिहिले आहे की, आज तुम्ही एक आई म्हणून आणि स्वतःचे करिअर या दोन्ही गोष्टींची निवड करताना, या दोघांमधला समतोल नेमका कसा राखता याबद्दलचे तुमचे अनुभव शेअर करून मला सांगा. मातृत्व आणि करिअर या दोघांमधला समतोल राखण्यासाठी, तुम्ही तुमच्या करिअरमधून ब्रेक घेतला आहे का ? किंवा तुम्ही वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे का? तुम्ही तुमच्या ऑफिसला दररोज जाता का ? यातच तुम्ही तुमच्या मुलांना कसे सांभाळता, त्यांची देखभाल कशी करता? आपण आपल्या कामांमुळे मुलांकडे नीट लक्ष देऊ शकत नाही म्हणून तुम्हाला अपराधी वाटते का ? तुमचे करिअर आणि मातृत्व हे दोन्ही एकत्रितरित्या सांभाळताना तुमच्या पाठीशी कुणी खंबीर उभं आहे का किंवा तुम्हांला मदत करणारी सपोर्ट सिस्टम आहे का ? ज्या आईंनी माझ्यासारखे एक पाऊल मागे घेणे निवडले आहे - तुम्हाला याबद्दल कसे वाटते याबद्दल काही विचार आहेत का? तुम्ही मातृत्वाची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या करिअरला ब्रेक दिला आहे, हे योग्य आहे का ? यांसारख्या वेगवेगळ्या अनुभवांवर चर्चा करण्याचे आवाहन समीराने नवमातांना केले आहे. 

एवढूशा लेकानं आईला वाढला नाश्ता.. करिना कपूरची व्हायरल पोस्ट, जेहची तारीफ करत म्हणाली...


यावर समीराला नवमातांनी दिलेल्या प्रतिक्रिया... 

एका युजरने या प्रश्नांची उत्तर देताना कमेंट्समध्ये म्हटले आहे की, या सगळ्या गोष्टी तुमच्यावर आहेत. तुम्ही या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघता याला फार महत्व आहे. माझा मुलगा दिड वर्षाचा असताना मी परत जॉब सुरु केला होता. परंतु भयानक कोविडच्या काळात माझ्या मुलाला माझी जास्त गरज होती म्हणून मी जॉब सोडला होता, परंतु आता कोविडची परिस्थिती निवळली आहे त्यामुळे मी आता परत जॉब करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे मातृत्व की करिअर हे निवडताना तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. पोस्टला उत्तर देताना दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे कीं, कधी कधी आपण मुलांना सोडून करिअर निवडतो ही अपराधीपणाची भावना वाटते. परंतु मी एक वर्किंग आई आहे त्यामुळे माझ्या मुलीने ती ३ महिन्याची असल्यापासून मला काम करताना बघत आहे, त्यामुळे आता तिने देखील माझ्याशी तितकेच जुळवून घेतले आहे. मला घरात इतर कामात मदत करणारी माणसं आणि आधार देणारा नवरा आहे, त्यामुळे या जीवनप्रवासात आम्ही सगळेच एकत्र आहोत. तुम्ही नोकरी करणारी आई असो किंवा पूर्णवेळ मातृत्व स्वीकारलेली आई असो, तुम्ही कोणतीही भूमिका बजावत असाल, जोपर्यंत तुम्ही आतून आनंदी असाल तोपर्यंत तुमच्या आजूबाजूचे जग देखील तितकेच आनंदी असेल. समीराच्या अशा असंख्य प्रश्नांना नवमातांनी अगदी सकारात्मक उत्तरे दिल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Sameera Reddy pens a note on career post motherhood: ‘How can one balance it all?’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.