Lokmat Sakhi >Parenting > २ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रिन दाखवताय? सावधान! मुलांना होऊ शकतात ३ गंभीर त्रास, तज्ज्ञ सांगतात....

२ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रिन दाखवताय? सावधान! मुलांना होऊ शकतात ३ गंभीर त्रास, तज्ज्ञ सांगतात....

Screen or Mobile Addiction in Children: मुलं त्रास देतात, काम करू देत नाहीत म्हणून त्यांना जर मोबाईल देऊन टाकत असाल, तर वेळीच सावध व्हा!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 09:11 AM2023-08-22T09:11:02+5:302023-08-22T09:15:02+5:30

Screen or Mobile Addiction in Children: मुलं त्रास देतात, काम करू देत नाहीत म्हणून त्यांना जर मोबाईल देऊन टाकत असाल, तर वेळीच सावध व्हा!!

Screen or Mobile addiction in children under 0 to 2 years causes virtual autism, side effects of screen addiction in children | २ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रिन दाखवताय? सावधान! मुलांना होऊ शकतात ३ गंभीर त्रास, तज्ज्ञ सांगतात....

२ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रिन दाखवताय? सावधान! मुलांना होऊ शकतात ३ गंभीर त्रास, तज्ज्ञ सांगतात....

Highlightsतुमचीही मुलं याच प्रकारातली असतील, तर वेळीच सावध व्हा. कारण याविषयी बघा ही तज्ञांनी दिलेली विशेष माहिती.

आजकाल सगळ्याच पालकांच्या हातात मोबाईल दिसतो. त्यामुळे अगदी जन्माला आल्यापासूनच मुलं मोबाईल बघतात. मोबाईल बघतच ती मोठी होत आहेत, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. त्यात मुलं जर खात नसतील, बाहेर गेल्यावर त्रास देत असतील, पालकांना काम करू देत नसतील, तर अनेक पालक स्वतःहून मुलांना मोबाईल देऊन टाकतात. अगदी बोलता न येणारी मुलंही तासनतास मोबाईल बघत बसतात (Screen or Mobile Addiction in Children). तुमचीही मुलं याच प्रकारातली असतील, तर वेळीच सावध व्हा. कारण याविषयी बघा ही तज्ञांनी दिलेली विशेष माहिती.

 

ही माहिती इंस्टाग्रामच्या the_kidsdoctor या पेजवर शेअर करण्यात आलेली आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगतात की मुलांचा बौद्धिक मानसिक विकास ० ते २ या दरम्यान झपाट्याने होत असतो. पण नेमकं याच काळात जर मुलांना मोबाईल दाखवला तर मात्र त्याचे गंभीर परिणाम मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक आरोग्यावर होऊ शकतात.

पाकिटात चिप्स- चिवडा उरला तर पाकिटाचं तोंड बंद करण्याची १ खास ट्रिक, प्रवासात ठरेल उपयुक्त

अमेरिकन बालरोगतज्ज्ञ संघटना आणि भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना यांच्यामते ० ते २ या वयोगटातली मुलं खूप स्क्रीन बघत असतील तर त्यांची मानसिक आणि बौद्धिक वाढ कमी वेगात होऊ लागते. यामुळे मुलांना बोलण्यात अडचण येणे, भाषा शिकण्यात अडचण येते तसेच त्यांच्या वागणुकीतही अनेक दोष दिसू लागतात. यालाच व्हर्च्युअल ऑटीझम असं म्हणतात.  

 

असं होण्याचं कारण म्हणजे मुलं स्क्रिन बघत राहिली की मेंदुचा वापर करणे थांबवतात. त्यामुळे या काळात त्यांना स्क्रिनपासून दूर तर ठेवावेच.

एक पैसाही खर्च न करता त्वचा हाेईल सुंदर- दिसाल तरुण, रोज फक्त ५ मिनिटे करा हे काम - सुरकुत्या गायब

पण त्यासोबतच त्यांचा बौद्धिक, मानसिक विकास होईल, असे खेळ त्यांच्यासोबत खेळावेत. त्यांना गोष्टी सांगाव्या, पुस्तकातील चित्रे दाखवावीत तसेच त्यांच्या वयोगटानुसार असणारी विविध खेळणी त्यांना आणून द्यावीत. 

 

Web Title: Screen or Mobile addiction in children under 0 to 2 years causes virtual autism, side effects of screen addiction in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.