Lokmat Sakhi >Parenting > तुम्ही ‘हा’ व्हिडिओ तुमच्या मुलांना दाखवला की नाही? पाहा विराट कोहली त्यांना काय सांगतोय..

तुम्ही ‘हा’ व्हिडिओ तुमच्या मुलांना दाखवला की नाही? पाहा विराट कोहली त्यांना काय सांगतोय..

See Virat Kohli's Guidelines For Children And Parents As Well : इंडियासाठी खेळायचं तर काय करु, या प्रश्नाला विराट कोहलीचं उत्तर, फक्त मुलांसाठीच नाही तर आईबाबांसाठीही महत्त्वाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 13:03 IST2025-01-29T19:41:33+5:302025-01-30T13:03:38+5:30

See Virat Kohli's Guidelines For Children And Parents As Well : इंडियासाठी खेळायचं तर काय करु, या प्रश्नाला विराट कोहलीचं उत्तर, फक्त मुलांसाठीच नाही तर आईबाबांसाठीही महत्त्वाच

See Virat Kohli's Guidelines For Children And Parents As Well | तुम्ही ‘हा’ व्हिडिओ तुमच्या मुलांना दाखवला की नाही? पाहा विराट कोहली त्यांना काय सांगतोय..

तुम्ही ‘हा’ व्हिडिओ तुमच्या मुलांना दाखवला की नाही? पाहा विराट कोहली त्यांना काय सांगतोय..

एखाद्या लहान मुलांना विचारलं की त्यांना मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे? तर बरीच मुलं क्रिकेटर असं उत्तर देतात. भारतात क्रिकेट फक्त खेळ नाही आहे.( See Virat Kohli's Guidelines For Children And Parents As Well ) लोकांसाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे. एक क्रिकेटर बनणं भारतात सोपे नाही. भारतातील पालकांची मानसिकताही मुलांना करियर खेळाडू म्हणून करण्यास सहसा पाठिंबा देत नाहीत. खेळात भविष्य नाही.( See Virat Kohli's Guidelines For Children And Parents As Well ) असं मध्यम वर्गीय पालकांचं मत असतं. काही बाबतीत ते खरं ही आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नशीब कोणाच झळकेल आणि कोणाला घरी बसवेल सांगता येत नाही. पण मग मुलांचे स्वप्नचं चिरडून टाकायचे का? 

सध्या युथआयकॉन असलेला सर्वांचा लाडका खेळाडू म्हणजे विराट कोहली. त्याने खेळाडू व्हायचे असेल तर, काय करावे? या बाबत माहिती  दिली आहे. विराटला एका लहान मुलाने भारतीय क्रिकेटर होण्यासाठी काय करु असं विचारलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर क्रिकफीट या चॅनलवरून व्हायरल झालं. विराटची वाक्ये फक्त क्रिकेटर होऊ इच्छिणाऱ्यांना नाही तर प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वपूर्ण आहे.


 
विराटने सांगितले, प्रचंड मेहनत करावी लागेल. सतत प्रॅक्टिस करत राहा. तुमच्याहून चांगल्या खेळाडूपेक्षा चांगलं करायचा प्रयत्न करा. काहीही झालं तरी प्रॅक्टिस चुकवायची नाही. कायम दुसर्‍यांच्या पुढे राहायचा प्रयत्न करत राहा. मुख्य म्हणजे तुम्हाला त्या खेळात मज्जा आली पाहिजे. खेळताना कंटाळून चालणार नाही. लक्ष आणि आनंद दोन्ही खेळण्यातच असलं पाहिजे.  

विराट स्वतः एका सामान्य घरातून आलेला मुलगा आहे. त्याच्या यशाचे श्रेय तो कायम कुटुंबियांना देतो. घरच्यांच्या पाठिंब्या शिवाय खेळाडू बनणं शक्य नाही. विराटचा प्रवास पालकांना एक महत्त्वाचा संदेश देतो. तुमच्या मदती शिवाय तुमची मुलं एकटी पडतील. त्याच्यातील कौशल्य दाबून ठेऊ नका. त्यांना नशीब आजमावायची संधी द्या. आणि खेळाडू बनू इच्छिणाऱ्यांनी विराटने सांगितल्याप्रमाणे सतत कष्ट करत राहा. त्याशिवाय पर्याय नाही. आळस केल्यास काहीच साध्य करणं शक्य नाही. 
 

Web Title: See Virat Kohli's Guidelines For Children And Parents As Well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.