Join us  

लहान मुलांना सनस्क्रिन लावण्याची गरज आहे? डॉक्टर सांगतात 'या' वयोगटातल्या मुलांसाठी ते गरजेचं, कारण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 5:06 PM

Should Kids Need Sunscreen?: सनस्क्रिन लोशन ही फक्त मोठ्यांसाठीच गरजेची गोष्ट नाही. लहान मुलांनाही सनस्क्रिन लोशनची गरज आहे, असं बालरोगतज्ज्ञ सांगत आहेत. (what is the right age for applying sunscreen to kids?)

ठळक मुद्देबाजारात अनेक सनस्क्रिन लोशन उपलब्ध आहेत. पण बाळाच्या नाजूक त्वचेसाठी सनस्क्रिन निवडताना ते खूप काळजीपुर्वक घ्यावं.

जागतिक तापमानात आता बरीच वाढ झालेली आहे. त्यातच आता उन्हाळाही सुरू झाला आहे. उन्हाळ्यात तर दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे तर सोडा पण साधं खिडकीतून डोकावून पाहायलाही नको वाटतं. कारण उन्हाची दाहकता लगेच जाणवू लागते. अशावेळी त्वचा टॅन होणं किंवा सनबर्न होणं या घटना आपण नेहमीच ऐकताे. म्हणून एरवी वर्षभर तर सनस्क्रिन लावायलाच पाहिजे, पण उन्हाळ्यात तर ते अगदी न चुकता लावलं  पाहिजे, असं त्वचारोग तज्ज्ञ नेहमीच सांगतात (Should kids need sunscreen?). पण सनस्क्रिन हे फक्त मोठ्या व्यक्तींसाठीच गरजेचं नाही, तर लहान मुलांनाही ते आवर्जून लावायला पाहिजे (which sunscreen is good for kids?), असं बालरोगतज्ज्ञ सांगत आहेत. (what is the right age for applying sunscreen to kids?)

 

लहान मुलांनाही आहे सनस्क्रिन लोशनची गरज

लहान मुलांना सनस्क्रिन लोशन लावावं की नाही याविषयीचा एक व्हिडिओ dr_ajayprakash_pediatricia यांनी इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये ते लहान मुलांसाठी सनस्क्रिन लोशन अत्यावश्यक असल्याचं सांगतात.

ऑफिससाठी फॉर्मल लूक देणारं ब्लाऊज शिवायचंय? ७ सुंदर 'नेक डिझाईन्स'- दिसाल स्टायलिश, आकर्षक

बाळ अगदी एखाद्या महिन्याचं होण्याच्या आधीच आपण त्याला तेल, पावडर, बाळाचा साबण अशा सगळ्या गोष्टी लावायला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे बेबी सनस्क्रिन लोशनही बाळासाठी अतिशय गरजेचं आहे. बाळ ६ महिन्याचं झाल्यानंतर त्याला सनस्क्रिन नियमितपणे लावा, असं डॉक्टर सुचवतात.

 

बाळासाठी सनस्क्रिन निवडताना काय काळजी घ्यावी?

बाजारात अनेक सनस्क्रिन लोशन उपलब्ध आहेत. पण बाळाच्या नाजूक त्वचेसाठी सनस्क्रिन निवडताना ते खूप काळजीपुर्वक घ्यावं. spf 30, broad spectrum असणारं सनस्क्रिन बाळासाठी घ्यावं. शिवाय ते वॉटर रेझिस्टन्स असावं.

मधुमेह असेल तर नेमकी कोणती भाकरी खावी? ज्वारीची की बाजरीची?- डॉक्टर सांगतात.....

बाळासाठी सनस्क्रिन निवडताना त्यात कोणतेही हार्ड केमिकल्स तर नाही ना, हे एकदा आवर्जून तपासून पाहावं. तसेच स्ट्राँग सुवास असणारं सनस्क्रिनही बाळांसाठी घेऊ नये. 

mineral तसेच aerosal सनस्क्रिन बाळांसाठी टाळावे. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंब्यूटी टिप्ससमर स्पेशलत्वचेची काळजी