Lokmat Sakhi >Parenting > २ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रीन दाखवता? डॉक्टर सांगतात 'ही' चूक कराल तर तुमचं मूल कधीच..... 

२ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रीन दाखवता? डॉक्टर सांगतात 'ही' चूक कराल तर तुमचं मूल कधीच..... 

Parenting Tips: २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तुम्ही स्क्रीन दाखवत असाल तर त्याचा मुलांवर काय परिणाम होऊ शकतो ते पाहा... (Why is screen time bad for children under 2?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2024 12:11 PM2024-08-19T12:11:51+5:302024-08-19T12:12:30+5:30

Parenting Tips: २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तुम्ही स्क्रीन दाखवत असाल तर त्याचा मुलांवर काय परिणाम होऊ शकतो ते पाहा... (Why is screen time bad for children under 2?)

side effects of showing screen to kids below 2 years, Why is screen time bad for children under 2? | २ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रीन दाखवता? डॉक्टर सांगतात 'ही' चूक कराल तर तुमचं मूल कधीच..... 

२ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रीन दाखवता? डॉक्टर सांगतात 'ही' चूक कराल तर तुमचं मूल कधीच..... 

Highlightsजर तुम्ही मुलांना स्क्रीन दाखवली तर मात्र त्यांची आजुबाजुच्या परिस्थितीचं आकलन करण्याची क्षमता खूप कमी होत जाते. याचा मुलांच्या मानसिक, बौद्धिक प्रगतीवर परिणाम होतो.

आजकाल प्रत्येक लहान मुलाच्या हातात मोबाईल दिसतोच. बोटावर मोजण्याइतकीच मुलं असतील ज्यांना कमी वयात मोबाईल बघण्याची अजिबातच सवय नसेल. हल्ली मुलांचे दोन्ही पालक त्यांच्या त्यांच्या रुटीनमध्ये व्यस्त असतात. शिवाय घरात मुलांकडे लक्ष देण्यासाठी त्यांचं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये रमविण्यासाठी आजी- आजोबा किंवा इतर कोणी मंडळी नसतात. त्यामुळे मग नाईलाजाने पालकांना मुलांना मोबाईल द्यावा लागतो. त्यामुळे हल्ली तर मुलं बोलायला शिकायच्या आधीच मोबाईल बघणं शिकलेली असतात (side effects of showing screen to kids below 2 years). तुमचीही मुलं असंच करत असतील आणि विशेषत: दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे मुलं टीव्ही, मोबाईल किंवा इतर कोणत्याही प्रकारची स्क्रीन पाहात असतील तर त्याचा मुलांवर काय परिणाम होऊ शकतो ते पाहा... (Why is screen time bad for children under 2?)

 

२ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं स्क्रीन पाहात असतील तर....

२ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप अशी कोणत्याही प्रकारची स्क्रीन पाहात असतील तर त्याचा मुलांच्या बौद्धिक, मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो, याविषयीची माहिती social.nagar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

इंस्टंट नूडल्स खाऊन मुलं होतात लठ्ठ? घरीच करा आटा नूडल्स, कणकेच्या नूडल्स बनविण्याची भन्नाट ट्रिक

यामध्ये बालरोगतज्ज्ञ सांगतात की २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अजिबात स्क्रीन दाखवू नये, कारण या वयात मुलं त्यांच्या आजुबाजुच्या परिस्थितीचं खूप बारीक निरिक्षण करत असतात. त्यांना जे जे काही दिसतं, ऐकू येतं त्याचं आकलन करतात.

 

 त्यातूनच भाषा आणि इतर अनेक गोष्टी आपल्याही नकळत शिकतात. पण जर तुम्ही मुलांना स्क्रीन दाखवली तर मात्र त्यांची आजुबाजुच्या परिस्थितीचं आकलन करण्याची क्षमता खूप कमी होत जाते. याचा मुलांच्या मानसिक, बौद्धिक प्रगतीवर परिणाम होतो.

'जर ट्विंकलने माझा मोबाईल कधी चेक केला तर मी...',- बघा नेमकं काय सांगतो आहे अक्षयकुमार

याशिवाय काही अभ्यास असं देखील सांगतात की हल्ली बऱ्याच मुलांना मोबाईल किंवा टीव्ही बघत जेवण्याची सवय असते. यामुळे मुलांचं त्यांच्या जेवणाकडे अजिबात लक्ष नसतं. त्यामुळे मग पोट भरलं की नाही भरलं याचा कोणताही संदेश त्यांचा मेंदू त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही. अशी मुलं मग एक तर ओव्हरइटींग करतात किंवा मग उपाशी राहतात. त्यामुळे जेवतानाही मुलांना कोणत्याही प्रकारची स्क्रिन दाखवणे कटाक्षाने टाळावे. 


 

 

Web Title: side effects of showing screen to kids below 2 years, Why is screen time bad for children under 2?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.