आजकाल मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. शालेय अभ्यासापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत लोकं सतत स्मार्टफोनचा वापर करत असतात. अशा परिस्थितीत लहान मुलांमध्ये देखील स्मार्ट फोनच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
अनेक अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, जे लहान मुलं वारंवार सोशल मीडियावर असतात, त्यांना नैराश्याचा त्रास होण्याची शक्यता तिप्पट असते. अशा परिस्थितीत स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांमध्ये नैराश्याची समस्या का वाढत आहे, याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे(Signs of smartphone addiction in children).
यासंदर्भात, नवी मुंबईमधील अपोलो हॉस्पिटल्सचे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. रितुपर्णा घोष यांनी लहान मुलांमध्ये स्मार्ट फोनच्या वापरामध्ये वाढ का झाली आहे, यासह यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये कशी जातात याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
लहान मुलं माती का खातात? ही सवय तोडण्यासाठी ४ उपाय, सांभाळा आरोग्य
मुलांमध्ये वाढतोय स्मार्ट फोनचा वापर
स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे लोकांना अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, या तंत्रज्ञानाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होताना दिसून येत आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आजकाल मुलांमध्ये नैराश्याशी संबंधित समस्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये नैराश्य का वाढत आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
स्मार्टफोन बनलाय डिप्रेशनचं कारण?
अनेक अभ्यासांमध्ये स्मार्टफोनचा वाढता वापर, व मुलांमध्ये नैराश्याचे वाढते प्रमाण यांच्यातील संबंध आढळून आले आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे झोप पूर्ण न होणे, शारीरिक हालचाली कमी होणे, याशिवाय समोरासमोर बोलायला संकोच वाटणे. या समस्या निदर्शनास येतात.
बाळ पलंगावरुन किंवा झोळीतून पडलं तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काय कराल?
यासह सायबरबुलिंग किंवा ऑनलाइन छळवणुकीच्या प्रकरणात देखील ते अडकू शकतात. मुख्य म्हणजे स्मार्टफोनच्या स्क्रीनमधून निघणारी ब्ल्यू लाईट, मुलांच्या झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकतात. ज्यामुळे शांत झोप घेणे कठीण होऊन जाते. अपुऱ्या झोपेमुळे मुलांमध्ये नैराश्य आणि चिडचिडेपणा दिसून येते.
स्मार्टफोन वापरण्याचे दुष्परिणाम
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांना समोरासमोर बोलायला संकोच वाटायला सुरुवात होते. मुलांचा कॉन्फिडेंस खूप कमी होतो. ज्यामुळे ते वास्तविक जगामध्ये कमी वेळ घालवू लागतात. एकटे राहायला सुरुवात करतात, माणसं बोलायला आल्यानंतर त्यांना उद्धत उत्तरं देतात. त्यांच्यासोबत बोलणे टाळतात. अशा परिस्थितीत ते हळू हळू नैराश्याच्या वाटचालीकडे निघतात.
मुलांना यातून वाचवायचं कसं?
मुलांमध्ये स्मार्टफोनच्या संबंधित नैराश्याची समस्या दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. नैराश्याची सुरुवातीची लक्षणे ओळखून त्यावर उपाय केल्याने त्यांना वेळीच रोखण्यात मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त, मुलांशी सतत संवाद साधत राहा. त्यांना इतर कोर्स किंवा त्यांच्या आवडीप्रमाणे अॅक्टिव्हिटी करण्यास प्रोत्साहित करा. ज्यामुळे स्मार्टफोनचं लागलेलं व्यसन सुटेल, व नैराश्य देखील छळणार नाही.