आपली मुलं स्मार्ट, (Smart Kid) अंडरस्टॅडींग असावं असं प्रत्येकाला वाटतं. अनेकदा पालक आपल्या मुलांना इतर मुलांचे उदाहरण देतात. अशावेळी मुलं चिडतात किंवा रागराग करतात. अशात मुलं बुद्धीमान होत नाहीत. काही खास सवयी मुलांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. (How To Become Intelligent And Smart) लहानपणापासून काही सवयी असतील तर मुलं बुद्धीमान होतात.
पेरेंटींग फर्स्ट क्राय च्या रिपोर्टनुसार बुद्धीमान मुलं नेहमीच एकटं राहणं पसंत करतात किंवा खूप जास्त प्रश्न विचारतात. रडत न बसताना सोल्यूशन काढण्याचा प्रयत्न करतात. ही मुलं थोडी जिद्दी असू शकतात इमोशनली स्ट्राँग असतात. नेहमी अलर्ट असतात आय कॉन्टॅक्सकडे त्यांचे पुरेपूर लक्ष असते. (Sign Of Intelligent And Smart Kid How Do you Know Child is Intelligent)
बुद्धीमान मुलांमध्ये असलेल्या महत्वाच्या सवयी कोणत्या? (Sign Of Intelligent And Smart Kid)
१) वेळेवर लक्ष द्या
जी मुलं दुसऱ्या मुलांपेक्षा जास्त समजदार असतात ते वेळेकडे कधीच दुर्लक्ष करत नाहीत. वेळोबरोबर ते आपलं काम मॅनेज करतात. लहानपणापासूनच त्यांचे फिक्स शेड्यूल असते. रूटीन ठरवून दिल्यामुळे मुलं सिस्टमॅटिक वागतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात.
२) प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतात
काही मुलं दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकून, बघून त्यांना फॉलो करतात. काही मुलांना गर्दीपासून वेगळं राहायला आवडतं. तर काहीजण खूप बुद्धीमान असतात. प्रत्येक गोष्ट नोट करतात आणि फॉलो करण्याचा प्रयत्न करतात.
३) प्रश्न विचारायला आवडतं
काही मुलं पालकांना, शिक्षकांना प्रश्न विचारत नाहीत. जेव्हा मुलं बुद्धीमान या कॅटेगरीत येतात तेव्हा विचार न करता लोकांना प्रश्न विचारतात. आपल्या शंका दूर करण्याकडे लक्ष देतात.
केस फार पातळ झालेत? तुळशीच्या पानांचा १ जादूई उपाय, कंटाळा येईल इतके दाट-लांब होतील केस
४) टार्गेटवर फोकस करा
बुद्धीमान मुलं आधी टार्गेट ठरवतात. नंतर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अभ्यासात किंवा घरात कोणतंही छोटं मोठं काम करण्याच्या प्रयत्नात असलेली मुलं हूशार असतात.
५) आरोग्याकडे लक्ष देतात
बुद्धीमान मुलांना चांगलं लक्षात असते की काम करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी तब्येत चांगली असणं गरजेचं असतं. तब्येतीवर पुरेपूर लक्ष देतात. जंक फूड कमी खातात आणि फिजिकली फिट राहतात.
पोट सुटलंय, मांड्यांचा शेप बिघडला? १० दिवस सकाळी हे पाणी प्या, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल
६) नवीन गोष्टी एक्सप्लोअर करा
पुस्तकी ज्ञान मिळवणं सोपं असतं पण बुद्धीमान मुलं स्वत:हून वेगळं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. पुस्तकं किंवा मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे इतर मुलांपेक्षा त्यांना जास्त माहिती असते.