Lokmat Sakhi >Parenting > सहा महिन्याच्या लेकाला सोनम कपूर काय सांगतेय पाहा, लेकासाठी सोनमने शोधली सुंदर गोष्ट..

सहा महिन्याच्या लेकाला सोनम कपूर काय सांगतेय पाहा, लेकासाठी सोनमने शोधली सुंदर गोष्ट..

Sonam Kapoor Son Vayu Photos Motherhood Parenting : व्हिडिओमध्ये आनंद आहुजा वायुला घेऊन खेळवताना दिसत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 10:09 AM2023-03-17T10:09:46+5:302023-03-17T14:34:55+5:30

Sonam Kapoor Son Vayu Photos Motherhood Parenting : व्हिडिओमध्ये आनंद आहुजा वायुला घेऊन खेळवताना दिसत आहे.

Sonam Kapoor Son Vayu Photos Motherhood Parenting : See what Sonam Kapoor does to entertain her son, spending time with her son... | सहा महिन्याच्या लेकाला सोनम कपूर काय सांगतेय पाहा, लेकासाठी सोनमने शोधली सुंदर गोष्ट..

सहा महिन्याच्या लेकाला सोनम कपूर काय सांगतेय पाहा, लेकासाठी सोनमने शोधली सुंदर गोष्ट..

मूल लहान असताना आई आणि वडीलांनी मुलांना वेळ देणं अतिशय गरजेचं असतं. मुलांना रमवण्यासाठी, त्यांचा चांगला विकास व्हावा यासाठी मूल जन्माला आल्यापासून आपण त्याच्याकडे लक्ष देत असतो. ही गोष्ट कोणत्याही आईला चुकलेली नाही. मग ती राजकीय पुढारी असो किंवा एखादी व्यावसायिक महिला. अगदी अभिनेत्री असली तरीही मुलांच्या संगोपनासाठी त्याही मुलांना वेळ देतातच. अभिनेत्री करीना कपूर, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा या आपल्या मुलांसाठी काय काय करतात हे अनेकदा सोशल मीडिया किंवा बातम्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर येते. आनंद आहुजा आणि सोनम यांनी ६ महिन्यापूर्वीच आपल्या बाळाला जन्म दिला. नव्यानेच आई झालेली सोनम कपूरही आपला मुलगा वायूचे अपडेटस शेअर करत असते (Sonam Kapoor Son Vayu Photos Motherhood Parenting). 

नुकतेच तिने लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत. आपल्या लंडनमधील घरात फॅमिलीसोबत ती कसा वेळ घालवत आहे याची झलक यामध्ये पाहायला मिळते. एका फोटोमध्ये मुलाला मांडीत घेऊन बेडवर बसून पुस्तक वाचून दाखवताना दिसत आहे.  यावेळी तिचा मुलगाही अतिशय कौतुकाने ती वाचत असलेल्या पुस्तकात पाहताना दिसत आहे. पेपर डॉल्स असे या पुस्तकाचे नाव असून ज्युलिया डोनाल्डसन यांनी हे पुस्तक लिहीले आहे. यामध्ये एका तरुण मुलीची गोष्ट सांगितली आहे.  ही मुलगी तिच्या आईच्या मदतीने पेपरच्या बाहुल्या तयार करत असते. या पेपरच्या बाहुल्यांना या मुलीने टिकी, टॅकी, बॅकी, जॅकी आणि जिम अशी मजेशीर नावंही दिलेली आहेत.  ही मुलगी तयार करत असलेल्या या बाहुल्या या संपूर्ण गोष्टीतील मुख्य पात्र असून त्यांच्या भोवती ही गोष्ट फिरते. 

एका फोटोमध्ये ती आपल्या मुलाला स्ट्रोलरमध्ये घेऊन रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.  तर एका व्हिडिओमध्ये आनंद आहुजा वायुला घेऊन खेळवताना दिसत आहे. अवघ्या २ दिवसांत सोनमच्या या पोस्टला ३.५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. करीना कपूरने सोनम वाचत असलेले पुस्तक किती छान आहे अशा आशयाची कमेंट केली असून आनंद आहुजानेही बायकोचे कौतुक करणारी कमेंट केली आहे. मागील वर्षी २० ऑगस्टला वायूचा जन्म झाला असून सोनमने काही ना काही निमित्ताने वायूचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र यामध्ये तिने त्याचा चेहरा दाखवला नव्हता. नुकताच त्याचा ६ महिन्यांच्या वाढदिवसाचे फोटोही सोनमने शेअर केले आहे.   

 

 

Web Title: Sonam Kapoor Son Vayu Photos Motherhood Parenting : See what Sonam Kapoor does to entertain her son, spending time with her son...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.