Lokmat Sakhi >Parenting > कितीही चांगलचुंगलं खाऊ घातलं तरी मुलांच्या अंगी लागत नाही? ४ पदार्थ नियमित द्या, तब्येत सुधारेल चटकन

कितीही चांगलचुंगलं खाऊ घातलं तरी मुलांच्या अंगी लागत नाही? ४ पदार्थ नियमित द्या, तब्येत सुधारेल चटकन

Parenting Tips : शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता भासल्यास हाडांमध्ये वेदना होऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 04:16 PM2024-09-11T16:16:55+5:302024-09-12T18:55:37+5:30

Parenting Tips : शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता भासल्यास हाडांमध्ये वेदना होऊ शकतात.

Start Eating These 4 Things To Children in Childhood Itself For Bones Muscles Strong Bone Health Diet | कितीही चांगलचुंगलं खाऊ घातलं तरी मुलांच्या अंगी लागत नाही? ४ पदार्थ नियमित द्या, तब्येत सुधारेल चटकन

कितीही चांगलचुंगलं खाऊ घातलं तरी मुलांच्या अंगी लागत नाही? ४ पदार्थ नियमित द्या, तब्येत सुधारेल चटकन

प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुलांची तब्येत चांगली राहावी पण अनेक लहान मुलांना तब्येतीच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. लहानपणापासून हाडांना व्यवस्थित पोषण न मिळाल्यामुळे मोठेपणी ऑस्टिओपॅरोसिस यांसारखे आजार उद्भवतात. ( Parenting Tips) कमकुवत हाडांशी संबंधित हा आजार आहे यासाठी डाएटवर लक्ष देणं महत्वाचे आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका आर्य यांनी अधिक माहिती दिली आहे. (Food For Kids Strong Bones)

डॉ. प्रियंका सांगतात की हाडांच्या निर्मितीसाठी कॅल्शियम फार महत्वाचे असते. कॅल्शियमच्या कमतरतेनं हाडं कमजोर व्हायला सुरूवात होते. थोडी जरी ठेच लागली तरी फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत मुलांनी डेअरी प्रोडक्टस, दूध, पनीर, दही यासोबतच पालेभाज्या आणि नट्सचे सेवन करायला हवे. 

नाश्त्याला पोहे खा-५ किलो वजन कमी करा; डॉक्टर सांगतात पोहे खाऊन वजन कमी करण्याची ट्रिक

शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता भासल्यास हाडांमध्ये वेदना होऊ शकतात. म्हणून कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी मुलांना सकाळच्या कोवळ्या ऊन्हात पाठवा. सकाळचं ऊन व्हिटामीन डी चा  चांगला स्त्रोत आहे.नियमित व्यायाम केल्यानं मुलांच्या शारीरिक विकासात मदत होते. व्यायाम केल्यानं हाडं मजबूत होतात याशिवाय मांसपेशी मजबूत होतात. मुलांना जास्त  थकवा येईल असा व्यायाम करायला फोर्स करू नका. पण त्यांना काहीवेळ जॉगिंग, जंपिंग आणि रनिंग, सायकलिंग असे व्यायाम करायला सांगा.

लहानपणापासूनच मुलांची हाडं मजबूत होण्यासाठी त्यांना फ्रुट्स ज्यूस पिण्याची सवय लावा. ताज्या फळांचा रस किंवा ड्राय फ्रुट्स शरीरात व्हिटामीन्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स याशिवाय प्रोटीन्सची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. आंबट फळं व्हिटामीन सी ची कमतरता पूर्ण करतात. म्हणूनच आहारात संत्री, मोसंबी, किव्ही यांसारख्या फळांचा समावेश करा. 



एक्सपर्ट्सच्या मते कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कॅल्शियम रिच फूड्स  घेण्याआधी हेल्थ एक्सपर्ट्सचा सल्ला घ्या. याव्यतिरिक्त वयानुसार मुलांच्या किती प्रमाणात अन्न द्यावं हे डॉक्टरांना विचारून घ्या.

Web Title: Start Eating These 4 Things To Children in Childhood Itself For Bones Muscles Strong Bone Health Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.