मुलांचा अभ्यास घेणं हा पालकांसाठी खूप मोठा टास्कच असतो. जर मुलं कळत्या वयातील असतील असतील तर ते स्वतःचा अभ्यास स्वतः करतात. याउलट काही मुलांच्या अभ्यासात पालकांना लक्ष घालावेच लागते. काही मुलं ही समजून - उमजून परीक्षेच्या आधी आपला अभ्यास पूर्ण करतात. याउलट काही मुलं अभ्यासाच्या नावाखाली नुसतीच घोकंपट्टी करतात. काहीवेळा काही मुलांच्या बाबतीत आपल्याला हेच चित्र पाहायाला मिळते. कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा म्हटलं की तो वाचन, लेखन, पाठांतर यांसारख्या स्टेप्स फॉलो करुन केला जातो. किमान वाचन, लेखन, पाठांतर केले तर आपल्याला कोणत्याही विषयाचा अभ्यास लक्षात ठेवणे सहसा कठीण जात नाही(Tips to help your child remember what he has studied).
काही मुलं ही वर्षभर आधीच अभ्यास करुन परीक्षेसाठी तयार असतात, तर काही परीक्षेच्या अगदी आदल्या दिवशी अभ्यास करायला घेतात. असा घाई - गडबडीत केलेला अभ्यास आपल्या फारसा लक्षात राहत नाही. तसेच आयत्यावेळी अभ्यास करायला घेतला की काय करावे आणि काय करु नये असे होते. अशावेळी मुलं अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी चक्क रट्टा मारतात. रट्टा मारणे म्हणजेच अभ्यासाचा योग्य अर्थ समजून न घेता नुसते शब्दाला शब्द जोडून पाठांतर करणे होय. काहीवेळा रट्टा मारुन मुलं परीक्षेत पासही होतात परंतु त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान त्याला आले आहे का याबाबतीत प्रश्नचिन्ह उभे राहते. नुसतीच घोकंपट्टी किंवा रट्टा मारणे याला अभ्यास म्हणत नाहीत. जर आपले मुलं (Parenting Tips) देखील अभ्यासाच्या नावाखाली नुसतीच घोकंपट्टी करत असेल तर वेळीच त्याच्या ते लक्षात आणून दिले पाहिजे. याचबरोबर त्याची रट्टा मारण्याची ही सवय कशी सोडवता येईल याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे(Study Tips do not teach kids mug up syllabus before exam teach them to understand thing).
अभ्यासाच्या नावाखाली मुलं नुसतीच घोकंपट्टी करतात अशावेळी काय करावे ?
१. नुसतीच एखाद्या विषयाची घोकंपट्टी केल्याने किंवा रट्टा मारल्याने फक्त शाब्दिक ज्ञान प्राप्त होते. यामुळे केवळ ते शब्द मुलांच्या मनात बिंबवले जातात. परंतु त्याचा खरा अर्थ मुलांच्या मेंदू पर्यंत पोहोचत नाही. परिणामी मुलांना त्या विषयाचे अपुरे ज्ञान मिळते. कोणत्याही क्षेत्राशी संबंधित ज्ञानाची व्याप्ती ही मुलाने जेवढे नुसतीच घोकंपट्टी करुन पाठ केले आहे तेवढ्यापुरतीच मर्यादित राहते. एखाद्या विषयाची माहिती मुलाने जेवढे रट्टा मारुन पाठ केले आहे तेवढेच त्याला माहित असते. नुसतेच पाठ केल्याने त्या विषयांतील इतर गोष्टींबद्दलचे खरे ज्ञान हे मुलांना तुलनेने कमीच असते. त्यामुळे एखाद्या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करणे, तो समजून घेणे हाच उत्तम मार्ग आहे, हे आपल्या मुलांना पालकांनी समजावून सांगितले पाहिजे.
अभ्यास कर चॉकलेट देईन असं म्हणत तुम्ही मुलांना आमिष दाखवता ? पालकांसाठी ही सवय घातक कारण...
२. गोष्टी सखोलपणे समजून घेतल्याने व्यक्तीची बौद्धिक क्षमता वाढते. परंतु रट्टा मारल्यामुळे मुलाचा मानसिक विकास पुरेसा होत नाही. त्यामुळे एखादा विषय संपूर्णपणे समजून घेण्यासाठी मुलांनी शिक्षक किंवा पालकांची मदत घ्यावी, यासाठी त्यांना प्रवृत्त करावे.
काहीही केलं तरी मुले पालेभाज्या खातच नाहीत? ६ उपाय, पालेभाज्याही खातील आवडीने...
३. सततच्या अभ्यासाच्या घोकंपट्टीमुळे मुलांना थकवा येतो. जेव्हा मुले संकल्पना समजून न घेता गोष्टी लक्षात ठेवतात तेव्हा ही प्रक्रिया सतत करणे काही काळानंतर असह्य होते ज्यामुळे त्यांना थकवा जाणवतो. त्यामुळे पालकांनी वेळीच लक्ष देऊन मुलांची ही वाईट सवय सोडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? ८ टिप्स - मोबाइलशिवाय मुले जेवत झोपत नाही ही तक्रार संपेल...
४. नुसताच अभ्यासाचा रट्टा मारल्यामुळे मुले प्रत्यक्ष जीवनात व्यावहारिक होऊ शकत नाहीत. विषय आणि लेखनाचा अर्थ समजून घेतल्याने मुले अधिक कार्यक्षम होतात आणि जीवनातील अडचणींमध्येही ते अर्थ समजून घेऊन हाताळण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ते अधिक प्रवीण होतात. यासाठीच लहान वयात मुलांना पुढील जीवनात येणारे व्यावहारिक ज्ञान समजून घेण्यासाठी त्यांची ही सवय वेळीच सोडवून पालकांनी त्यांना मदत केली पाहिजे.
आईबाबा ऑफिसात आणि वयात येणारी मुलं घरी एकटीच? ४ गोष्टी मुलांना सांगा, नाहीतर होते गडबड
५. स्मरणशक्ती ही एक अल्पकालीन प्रक्रिया आहे जी थोड्या काळासाठी प्रभावी असते, तर अर्थ समजल्यानंतर लिहिण्याची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे जी दीर्घकाळ लक्षात ठेवली जाते. यासाठीच मुलांना एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास व मूळ विषयाचा गाभा लक्षात ठेवण्यासाठी पालकांनी तयार करावे, किंवा लहानपणापासूनच त्यांना तसा अभ्यास करण्याची सवय लावली पाहिजे.