Lokmat Sakhi >Parenting > मुलांनी तुमचं सगळं ऐकावं असं वाटतं? सुधा मूर्ती सांगतात ४ टिप्स, समजूतदार-गुणी होतील मुलं

मुलांनी तुमचं सगळं ऐकावं असं वाटतं? सुधा मूर्ती सांगतात ४ टिप्स, समजूतदार-गुणी होतील मुलं

Sudha Murthy Parenting Tips : सुधा मुर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांवर फक्त नियम लागू करणं ही पालकांची जबाबदारी नसते. त्यांना चांगली उदाहरणंही द्यायला हवीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 09:42 AM2024-01-22T09:42:03+5:302024-01-22T09:57:11+5:30

Sudha Murthy Parenting Tips : सुधा मुर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांवर फक्त नियम लागू करणं ही पालकांची जबाबदारी नसते. त्यांना चांगली उदाहरणंही द्यायला हवीत.

Sudha Murthy Parenting Tips : Sudha Murty's Shares a Excellent Parenting Tips | मुलांनी तुमचं सगळं ऐकावं असं वाटतं? सुधा मूर्ती सांगतात ४ टिप्स, समजूतदार-गुणी होतील मुलं

मुलांनी तुमचं सगळं ऐकावं असं वाटतं? सुधा मूर्ती सांगतात ४ टिप्स, समजूतदार-गुणी होतील मुलं

आपल्या मुलांनी आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाचा सामना न घाबरता करता असं प्रत्येक पालकाला वाटतं.   जेव्हा तरूण मुलांचा प्रश्न  येतो तेव्हा पालकांकडून अपेक्षा जास्त वाढलेल्या असतात. वाढत्या वयात  मुलांना हॅण्डल करणं काही सोपं काम नाही. मुलांच्या पालनपोषणात थोडी  जरी चूक केली तर त्याचे भविष्य धोक्यात येऊ शकते. (Sudha Murthy Parenting Tips) अशा स्थितीत आपल्या किशोरवयीन मुलांना आत्मविश्वास देऊन आयुष्यातील प्रत्येक स्थितीचा सामना करायला शिकवायला हवं. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी पालकांना काही खास टिप्स सांगितल्या आहेत. (Tips And Other Parenting Advices Sudha Murthy Has For Parents)

1) मुलांना पर्सनल स्पेस द्या

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास कमी आहे तर त्यांना त्यांची पर्सनल  स्पेस द्या पालकांनी मुलांना त्याचे आवडीचे खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवं. सुधा मूर्ती यांनी आई वडीलांनी कधीच आपल्या आवडी निवडी मुलांवर थोपवू नये असे सांगितले आहे.

अतिशय बुद्धीमान होतात लहानपणी 'या' सवयी असलेली मुलं; सायकोलॉजी सांगते स्मार्टनेसचं सिक्रेट

2) मुलांसाठी आदर्श बना

सुधा मुर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांवर फक्त नियम लागू करणं ही पालकांची जबाबदारी नसते. त्यांना चांगली उदाहरणंही द्यायला हवीत.  आई वडीलांनी आपल्या किशोरवयीन मुलांसाठी नेहमी एक रोल मॉडेल असायला हवे. तरच मुलांमध्ये खास गुण विकसित होतात. मुलांसाठी आदर्श निर्माण करायचा असेल तर त्यांच्याशी तसेच वागा.

वाचलेलं काहीच लक्षात राहत नाही? ४ गोष्टी करा; स्मरणशक्ती वाढेल, पाठ केलेलं विसरणार नाहीत मुलं

3) मुलांना साधेपणाचे महत्व समजावून सांगा

आजकाल किशोरवयीन मुलांना बाहेरचं ग्लॅमरस आणि दिखाऊपणाचे  दृश्य पाहून तसंच वागण्याची किंवा राहण्याची इच्छा होते. आई-वडीलांनी आपल्या मुलांना साधेपणाने आणि नम्रतेने वागायला शिकवायला हवं.  मुलांना कुटुंब आणि मित्र परिवारासोबत आनंद घेतील असे वातावरण असावे.

4) मुलांचे ऐकण्यासाठी आणि बोलण्याची वेळ काढा

आजकाल जास्तीत जास्त मुलं चुकीच्या मार्गाकडे वळतात कारण आई वडीलांकडे त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळच नसतो. अशा स्थितीत तुमची मुलं चुकीच्या गोष्टींकडे वळू शकतात.  अशावेळी  मुलांच्या समस्या ऐकून त्यांना सोल्यूशन द्या. सुधा मूर्तीनीं आई वडीलांना आपल्या मुलांचे मित्र बनून राहण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून ते प्रत्येक सुखदुखात आपल्या मुलांसोबत राहतील आणि मुलांना इतरांची गरज भासणार नाही.

Web Title: Sudha Murthy Parenting Tips : Sudha Murty's Shares a Excellent Parenting Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.