इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या पत्नी सुधा मूर्ती फक्त एक समाजसेविका, खासदार नाहीत तर एक उत्तम आईसुद्धा आहेत. (Parenting Tips In Marathi) सुधा मूर्ती नेहमीच लोकांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात याशिवाय पालकांना त्यांच्या चांगल्या पालनपोषणासाठीसुद्धा टिप्स देतात. (Sudha Murthy Said Parenting Is A Joyous Job Enjoyig It)
एका शोव्हमध्ये सुधा मूर्ती यांनी सांगितले की, आई-वडील बनणं एक जबाबदारी आहे पण त्यात आनंदसुद्धा असतो. (Sudha Murthy Parenting Tips) आपल्या मुलांना पुढे जाताना, त्यांना शाळेत जाताना, प्रश्न विचारताना पाहणं आणि त्याचं मोठं होणं हा पूर्ण प्रवास आनंददायी आहे. आई-वडीलांचे फक्त इतकेच काम नसते की मुलांचे पालनपोषण करावे आणि त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा ठेवू नये. (Life lessons from Sudha Murty that can help parents teach kids humility)
ओटी पोट, मांड्याची चरबी सुटलीये? रामदेव बाबा सांगतात ५ पदार्थ खा, भराभर वजन कमी होईल
सुधा मूर्ती सांगतात की तुम्ही असा विचार करत असाल की तुम्ही आपल्या मुलांवर खूप खर्च केला आहे आणि मोठं झाल्यानंतर मुलं त्या खर्चाची परतफेड करतील तर ते खूपच चुकीचे आहे. तुम्ही आपल्या मुलांना आपल्या आनंदासाठी जन्म दिला आहे. ही ईश्वराची एक अनमोल देण आहे. पालकांनी काय करावे काय करू नये यावर विचार करायला हवा आणि या सुंदर नात्याचा आनंद घ्यायला हवा. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पॅरेंटहूडचा आनंद घेऊ शकता.
काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात
क्रिएटिव्ह चाईल्डच्या वेबसाईडवर प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. आई वडील आपल्या मुलांच्या जीवनात सगळ्यात प्रभावी रोल मॉडेल असतात. तुम्ही आपल्या मुलांसाठी सर्वश्रेष्ठ रोल मॉडेल बनण्याचा प्रयत्न करा. या वास्तविकतेचा स्वीकार केल्यानंतर तुम्ही शांत आणि आनंदी फिल कराल. प्रत्येक दिवशी असे काही करा ज्यामुळे तुम्ही आजचा दिवस इन्जॉय करू शकाल. आपल्या मुलांसोबत ट्रिपला जा किंवा फिरायला जा. मुलांसोबत असं काही करा ज्याच्यामुळे भविष्यात काही घेणं-देणे नसेल.
लॅपटॉप सोबत न नेता फिरायला जा
एक जुनी म्हण आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीचा आनंद तोपर्यंत घेऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याची किंमत चुकवत नाही. तुम्ही कामातून वेळ काढून आपल्या कुटूंबाला वेळ द्यायला हवा. आपल्या मुलांची वागण्याची पद्धत तुम्ही नोट करू शकता, जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा या गोष्टी आठवून आनंदी राहा आणि पालकत्व इन्जॉय करा.