Join us  

नोकरी करणाऱ्या आईला सुधा मूर्ती देतात एक मोलाचा सल्ला, आपण कमीच पडतो असं वाटत असेल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2022 2:56 PM

नोकरी, पैसे कमावणे, मुलं सांभाळणे, घर यात ‘आई’ची ओढाताण होते, दोषही तिलाच दिला जातो, या साऱ्यावर उत्तर काय?

ठळक मुद्देनोकरदार आईला सुधा मूर्ती एक सल्ला देतात. त्या म्हणतात, या सगळ्या धावपळीत एक गोष्ट आईने आवर्जून करायला हवी..

आईवडील आणि एक किंवा दोन मुलं.. असं त्रिकोणी- चौकोनी कुटूंब. आईवडील कामावर, मुलांना घरी कोण सांभाळणार असा प्रश्न असतोच. त्यातही नोकरदार आईपुढे तर फार पेच. नोकरीही करायची असते, आर्थिक गरजही असते आणि मुलांना सांभाळण्यासाठी आवश्यक सोयी नसतात. सपोर्ट सिस्टिम नसतात. आजीआजोबाही आताशा आपापलं आयुष्य स्वतंत्र जगतात. तो बदलत्या जीवनशैलीचा भाग आहे. पण मग या साऱ्यात नोकरी करणाऱ्या आईची फार ओढाताण होते. अनेकदा दोष तिलाच दिला जातो, ती स्वत:लाही गिल्ट देते आणि त्यातून मग चक्र सुरुच होतं अपेक्षा आणि दोषांचं. अशा नोकरदार आईला सुधा मूर्ती एक सल्ला देतात. त्या म्हणतात, या सगळ्या धावपळीत एक गोष्ट आईने आवर्जून करायला हवी..

 

न्युक्लिअर फॅमिलीमध्ये आई म्हणून स्त्री ची भूमिका कशी असावी, याविषयीची पोस्ट सुधा मूर्ती यांनी नुकतीच इन्स्टाग्रामला शेअर केली आहे. यामध्ये त्या म्हणतात की ज्या घरात आई आणि वडील हे दोघेही कमावते आहेत, त्या घरात मुलांना सांभाळण्यासाठी, त्यांना वाढविण्यासाठी आणखी एका खंबीर सपोर्ट सिस्टिमची गरज असतेच, यात कोणतेही दुमत नाही.. घरातली स्त्री पण काम करतेय, पैसे कमावतेय, याचे कौतुक घरातल्यांना असते.

 

पण एका ठराविक मर्यादेपर्यंतच. जर अशा वर्किंग जोडप्यांची मुलं अभ्यासात, वागणुकीत किंवा इतर गोष्टीत कमी पडली, तर याचा संबंध कोणीही वडिलांच्या नोकरीशी लावत नाही. ''आई नोकरीत बिझी म्हणूनच मुले मागे पडली..'', असं नोकरी करणाऱ्या आईबाबत आपल्या समाजात अगदी सहज बोललं जातं.. म्हणूनच तर स्वत:चं करिअर आणि मुलांची प्रगती या दोन्ही गोष्टी वर्किंग वुमनला एकसमान तोलून धरायच्या असतात.

म्हणूनच सुधा मूर्ती सांगतात..अशा वर्किंग मुलांना पॅरेंटींगच्या बाबतीत एक मोलाचा सल्ला देताना सुधा मूर्ती म्हणतात की जर तुम्हाला तुमचं काम आणि मुलांचं संगोपन या दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील तर तुमचा विकेंडचा किंवा ऑफिसचं काम संपवून घरी आल्यानंतरचा सगळा वेळ मुलांसाठी द्या. या वेळेत मुलांसोबत खेळा आणि मुख्य म्हणजे त्यांना ज्या गोष्टी आवडतात, त्या गोष्टी त्यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न करा. त्या पुढे असंही म्हणाल्या की हा सल्ला अनेक आईंना पटणार नाही. मग आम्ही आमचं लाईफ कधी एन्जॉय करायचं? असा प्रश्नही त्यांना पडेल. पण पालकत्व ही एक मोठी जबाबदारी आहे, ते अजिबातच सोपं नाही.. आणि त्यांच्यासाठी तर मुळीच सोपं नाही, ज्यांच्या घरी मुलांकडे लक्ष देण्यासाठी, त्यांचं संगोपन करण्यासाठी दुसरे कोणीही कुटूंबातील सदस्य नाहीत..

 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंमहिलासुधा मूर्तीइन्स्टाग्राम