Lokmat Sakhi >Parenting > मुलांचं आयुष्य वाया जाऊ नये यासाठी ३ गोष्टी करा; आई-वडीलांना सुधा मूर्तींचा खास सल्ला.....

मुलांचं आयुष्य वाया जाऊ नये यासाठी ३ गोष्टी करा; आई-वडीलांना सुधा मूर्तींचा खास सल्ला.....

Sudha Murty Advised Parents : त्यांनी आपल्या मुलीला सांगितलं होतं की तुझ्याबद्दल मला इतर कोणाकडून काही कळायला नको. तू स्वत: मला येऊन सांगायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 12:44 PM2024-11-17T12:44:59+5:302024-11-17T13:08:21+5:30

Sudha Murty Advised Parents : त्यांनी आपल्या मुलीला सांगितलं होतं की तुझ्याबद्दल मला इतर कोणाकडून काही कळायला नको. तू स्वत: मला येऊन सांगायला हवं.

Sudha Murty Advised Parents Should Open The Communication Channel For Kids | मुलांचं आयुष्य वाया जाऊ नये यासाठी ३ गोष्टी करा; आई-वडीलांना सुधा मूर्तींचा खास सल्ला.....

मुलांचं आयुष्य वाया जाऊ नये यासाठी ३ गोष्टी करा; आई-वडीलांना सुधा मूर्तींचा खास सल्ला.....

सुधा मूर्ती फक्त एक समाजसेवक नसून त्या बिझनेस वूमन आणि पेरेंटींग कोचसुद्धा आहेत. त्यांनी आपल्या अनेक मुलाखतींमधून मुलांवर चांगले संस्कार करण्याबाबत भाष्य केले आहे. एका कार्यक्रमात एका विद्यार्थ्यानं सुधाजींना विचारलं की मुलं कोणत्या पद्धतीनं पालकांशी मोकळेपणा बोलू शकतात किंवा आपलं म्हणणं पालकांपर्यंत पोहोचवू शकतात (Sudha Murty Advised Parents).

सुधाजींनी सांगितले की मुलांनी आपल्या पालकांपासून काहीही लपवू नये. त्यांनी आपल्या मुलीला सांगितलं होतं की तुझ्याबद्दल मला इतर कोणाकडून काही कळायला नको. तू स्वत: मला येऊन सांगायला हवं. (Sudha Murty Advised Parents Should Open The Communication Channel For Kids)

याशिवाय सुधा मूर्तींनी पालकांना सल्ला दिला की, प्रत्येक पालकानं आपल्या मुलांशी बोलण्यासाठी वेळ काढायला हवा. जर मुलं तुम्हाला घाबरत असतील किंवा त्यांना तुमच्याशी बोलण्यात त्रास होत असेल तर ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट असू शकते. आई-वडीलांनी आपल्या मुलांशी मनमोकळेपणानं बोलायला हवं.

अभ्यास करूनही कमीच मार्क मिळतात? ४ पद्धती मुलांना शिकवा,अभ्यासाला बसा म्हणावंच लागणार नाही..

आईपेक्षा चांगला सल्ला कोण देऊ शकते

सुधा सांगतात की, मुलांना  त्यांच्या आई वडीलांपेक्षा चांगला सल्ला कोणीही देऊ शकत नाही. जर मुलांनी कोणा दुसऱ्याचा सल्ला मागितला तर त्यांना चुकीचं मार्गदर्शन मिळू शकतं. एका मुलासाठी त्याच्या आईशिवाय चांगला सल्लागार कोणाही असू शकत नाही.

पालकांनी नेहमी आपल्या मुलांशी मोकळेपणा बोलण्याचा पर्याय ठेवायला हवा. मुलांची याबाबत सहमती नसली तरी कमीत कमी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं. ज्यामुळे मुलांना वाटेल की तुम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट करत आहात. जर पालक मुलांच्या कोणत्याही गोष्टीशी असहमत असतील तर पालकांनी त्या मागचं लॉजिक सांगायला हवं. मुलांना त्यातली अडचण समजावून सांगा. नक्कीच मुलं हे समजून घेतील आणि त्यावर विचार करतील.

स्लिम पोट हवंय, डाएट होत नाही? १ महिना गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; झरझर घटेल वजन

सुधा मूर्ती सांगतात की पालकांनी आपल्या मुलांशी मनमोकळेपणानं बोलायला हवं. मुलांना आपल्या आई-वडीलांशी बोलण्यात कोणताही संकोच वाटायला नको. याशिवाय मुलांना ही जाणीव व्हायला हवी की पालक त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांना सपोर्ट करतील.

Web Title: Sudha Murty Advised Parents Should Open The Communication Channel For Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.