Lokmat Sakhi >Parenting > मोबाईल- सोशल मीडियावर ‘तसलं’ काही आपली मुलं पाहतच नाही, असं वाटतं तुम्हाला? संशोधन सांगते..

मोबाईल- सोशल मीडियावर ‘तसलं’ काही आपली मुलं पाहतच नाही, असं वाटतं तुम्हाला? संशोधन सांगते..

Survey About Mobile, Social Media And Its Side Effects On Children: मुलांच्या हातात मोबाईल, इंटरनेट आले आहे. त्यामुळे ते त्याच्यावर कोणत्या वेळी काय पाहतात यावर कोणाचेही काही नियंत्रण नाही.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2024 03:21 PM2024-06-15T15:21:02+5:302024-06-15T15:23:05+5:30

Survey About Mobile, Social Media And Its Side Effects On Children: मुलांच्या हातात मोबाईल, इंटरनेट आले आहे. त्यामुळे ते त्याच्यावर कोणत्या वेळी काय पाहतात यावर कोणाचेही काही नियंत्रण नाही.. 

survey about mobile, social media and its side effects on children | मोबाईल- सोशल मीडियावर ‘तसलं’ काही आपली मुलं पाहतच नाही, असं वाटतं तुम्हाला? संशोधन सांगते..

मोबाईल- सोशल मीडियावर ‘तसलं’ काही आपली मुलं पाहतच नाही, असं वाटतं तुम्हाला? संशोधन सांगते..

Highlightsहे सर्व्हेक्षण खरोखरच प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारे आहे. कारण वेगवेगळ्या साईट्स पाहताना मुलांच्या नजरेला कधी काय पडेल काही सांगता येत नाही. 

इंटरनेटचं जाळं सगळीकडे इतकं पसरलेलं आहे की आता त्याच्यावर कोणाचंही काही नियंत्रण नाही. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत आता प्रत्येकाकडेच मोबाईल नावाचं खेळणं आहे. आज काळानुसार तो गरजेचा झाला आहेच. पण गरजेपेक्षा हल्ली त्याचा दुरुपयोगच जास्त केला जात आहे. आता मोबाईल आला म्हणजे त्याच्यामागोमाग इंटरनेटही आलेच. इंटरनेट शिवाय मोबाईल असू शकतो, हे देखील आताच्या मुलांना माहिती नसावं. मोबाईल, इंटरनेट या गोष्टींचा एवढा सोपा ॲक्सेस शाळकरी मुलांना मिळाल्याने ते आता कोणत्यावेळी काय बघतात किंवा सर्फिंग करताना त्यांच्या नजरेला कधी काय पडतं हे काहीच सांगता येत नाही. बघा त्याविषयीचंच एक सर्व्हेक्षण काय सांगते....(survey about mobile, social media and its side effects on children)

 

मुलं, त्यांच्या हातात आलेला मोबाईल, मोबाईलवर ते काय पाहतात, कुटूंबाशी त्यांचा असलेला संवाद याविषयी राजस्थानमध्ये नुकतंच एक सर्व्हेक्षण करण्यात आलं. यामध्ये सहभागी झालेल्या ९७ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी सोशल मिडिया अश्लीलतेला प्रोतसाहन देत असल्याचं मान्य केलं आहे.

गव्हाच्या पिठाचे जाळीदार आप्पे! नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी सुपरहेल्दी पदार्थ- बघा इंस्टंट रेसिपी

मुलं नको त्या वयात शहाणी होत असून याचा मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत असल्याचं बहुसंख्य लोकांना वाटतं. या सर्व्हेक्षणात काही मुलांचाही सहभाग होता. त्यापैकी ९३ टक्के मुलांनी हे मान्य केलं आहे की समाज माध्यमांवर त्यांनी कधी ना कधी कोणती ना कोणती आक्षेपार्ह पोस्ट पाहिलेली आहे. 

 

या सर्व्हेक्षणातून समोर आलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळीच मुले मोबाईलवर अधिकाधिक वेळ घालवत आहेत. मोठी मुले अभ्यासाच्या नावाखाली तासंनतास मोबाईल हातात घेऊन बसतात.

सारखं काहीतरी खावं वाटतं आणि वजन वाढतं? Over Eating टाळण्यासाठी ३ उपाय, वजन उतरेल झर्रकन..

रिल्स आणि शॉट्स पाहण्यात वेळ घालवतात. यामुळे मुलांचा कुटूंबाशी असणारा संवाद दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. मुलांच्या मनात गुन्हेगारी विचार वाढत चालले असून आक्षेपार्ह पोस्टवर नियंत्रण असायला हवे असे जवळपास ९३ टक्के लोकांनी म्हटले आहे. हे सर्व्हेक्षण खरोखरच प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारे आहे. कारण वेगवेगळ्या साईट्स पाहताना मुलांच्या नजरेला कधी काय पडेल काही सांगता येत नाही. 

 

Web Title: survey about mobile, social media and its side effects on children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.