मातृत्व आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना अनेक जणींची घालमेल होत असते. कधी करिअरसाठी मुलांकडे दुर्लक्ष होतं, तर कधी मुलांसाठी करिअरवर पाणी सोडावं लागतं. किंवा दोन पावलं मागे यावं लागतं. प्रसिद्ध अभिनेत्री तसेच मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन (Sushmita Sen) ही देखील याला अपवाद नाही. मोठी अभिनेत्री असली तरी शेवटी ती आईच आहे. त्यामुळे काही वर्षांपुर्वी तिची मोठी मुलगी रिनी सेन (Rini Sen) हिला जेव्हा आई म्हणून सुश्मिताची गरज होती तेव्हा तिने करिअर बाजुला ठेवलं आणि मातृत्वाची निवड केली. या प्रसंगाबद्दल तिने नुकताच एक खुलासा केला आहे. (Sushmita Sen Says About Her Carrier And Daughter)
सध्या सुश्मिता सेनचा 'ताली' हा चित्रपट खूप गाजत आहे. या पार्श्वभूमीवर तिची नुकतीच एका वाहिनीवर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये तिने तिचं करिअर, मुली, वैयक्तिक आयुष्य अशा अनेक विषयांवर संवाद साधला.
गूळ घालून करा पौष्टिक नारळीभात, चव अशी भारी की नारळीपौर्णिमा होईल स्पेशल
यावेळी बोलताना ती म्हणाली की एकदा तिची मोठी मुलगी रिनी खूप आजारी होती. नेमके त्याच वेळी सुष्मिता अक्षय कुमार, करीना कपूर यांच्यासोबत परदेशात एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. यादरम्यान इकडे मुलीची तब्येत खूपच खराब झाली. तिला दवाखान्यात दाखल करावे लागले. त्यामुळे मग सुष्मिताला चित्रपटाचे शूटिंग अर्धवट सोडून मुलीकडे धाव घ्यावी लागली.
ती म्हणाली की त्यावेळी मी चित्रपटाचे शुटिंग सोडून आले खरी. पण मला तेव्हाच कळालं होतं की तो चित्रपट तर माझ्या हातातून जाणारच आहे. पण करिअरच्या दृष्टीनेसुद्धा ही बाब खूप नकारात्मक ठरणार आहे. आणि तसंच झालं.
नारळीभात एकदम गचका, आसट होतो? ५ टिप्स, भात होईल मोकळा आणि मऊ...
सुश्मिताने मुलीसाठी करियर दुसऱ्या स्थानावर ठेवलं. सुष्मिताने जो अनुभव सांगितला तो प्रत्येक करिअरिस्टिक आईच्या वाट्याला कधी ना कधी आलाच आहे. आई अगदी साधारण नोकरी करणारी असो, मजुरीवर जाणारी असो किंवा मग सुष्मितासारखी मोठे अभिनेत्री असो. मातृत्व आणि करियर यांच्यामधली घालमेल तिच्या वाट्याला कधी ना कधी येतेच येते...