मुलं लहान असेपर्यंत अंथरुणात लघवी करणे ही एक सामान्य गोष्ट मानली जाते. याउलट मुलं योग्य त्या वयात आल्यानंतरही जर अंथरूण ओले करत असेल तर तो काही पालकांसाठी चिंतेचा व संकोचाचा विषय ठरतो. लहान मुलांच्या या अंथरूण ओलं करण्याच्या सवयींबद्दल फारसं बोललं जात नाही, काहीवेळा या समस्येकडे दुर्लक्ष देखील केलं जात. अशा मुलांना मोठेपणी आपल्या या सवयीचा त्रास होऊ शकतो. अंथरुणांत लघवी (Bedwetting in children) करण्याच्या सवयीमुळे कळत्या वयात मुलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. या सवयीमुळे मुलांच्या विकासात अडथळा येऊ शकतो. या सवयीमुळे त्यांच्या बाल मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या अंथरुण ओलं करण्याच्या या सवयीकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार केले पाहिजेत. त्याचबरोबर अनेक पालकांनी हा लाजिरवाणा विषय म्हणून लपवून न ठेवता त्याबद्दल जनजागृती केली पाहिजे(Common Reasons Why Children Wet the Bed).
अंथरुण ओलं करण्याची ही सवय ६ ते १५ वयोगटांतील मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. अंथरुण ओलं करण्याची त्यांची ही सवय वेळीच मोडली नाही तर त्याचे आजारांत रुपांतर होऊ शकते. काही मुलांची ही सवय हळूहळू कमी होऊन बंद होते, पण काहींच्या बाबतीत असे होत नाही अशा मुलांच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. या सवयीची अनेक पालकांना व मुलांना लाज वाटते; मात्र हळूहळू ही सवय जाईल, असं पालकांना वाटतं. समाजात त्याबाबत जागरूकता (Tips for overcoming bed-wetting) कमी पडते आहे. अंथरूण ओलं करण्याच्या सवयीमुळे बाहेर जाणं, कोणाच्या घरी राहणं शक्य होत नाही. अशा प्रसंगी मुलांना ओरडा बसतो. इतकंच नाही, तर मुलांच्या प्रगतीवरही त्याचा परिणाम होतो, असंही डॉ. संजय पांडे यांनी सांगितलं. त्यामुळे मुलं लहान असतानाच त्यांची ही सवय घालवण्यासाठी प्रयत्न (How to Help Older Children Overcome Bedwetting) व्हायला हवेत. मुलं जशी मोठी होतात, तसतशी त्यांना आणखीनच लाज वाटू लागते. तो त्यांच्या वयात येण्याचा काळ असतो, त्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक गरजा बदललेल्या असतात. त्यावेळी या गोष्टींचा त्यांना त्रास होऊ शकतो(How To Help Your Child Stop Wetting the Bed).
मुलं अंथरुण ओलं का करतात ?
आपला मेंदू आणि युरिनरी ब्लॅडर अर्थात मूत्राशय यांच्यातली ही प्रक्रिया असते. ३ ते ५ वर्षं वयोगटातल्या मुलांना जेव्हा आई किंवा इतर कोणी टॉयलेट ट्रेनिंग देतात, तेव्हा ती सवय दिवसा लावली जाते; मात्र रात्री गाढ झोपेमध्ये तसं होत नाही. मेंदू आणि ब्लॅडर यांची एकमेकांशी लय जुळलेली नसते. टॉयलेटमध्ये जाऊन ब्लॅडर मोकळं करण्याबाबत मेंदू आणि ब्लॅडर यांचा समन्वय साधला गेलेला नसतो, तेव्हाच अंथरूण ओलं केलं जातं.
मुलांनी अंथरुण ओलं करण्याची कारणं...
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. शुभदा गुंजाळ - चौखंडे सांगतात की, आयुर्वेदानुसार मुलांमध्ये कृमी किंवा जंत असणे हे महत्वाचे कारण आहे. त्यासोबतच कोणत्याही प्रकारची भीती, असुरक्षिततेची भावना, मूत्राशयाचा आकार लहान असणे, मूत्राशयाचा अशक्तपणा, जननेंद्रियांचे संक्रमण, बद्धकोष्ठता यांसारख्या गोष्टी कारणीभूत ठरतात.
अंथरुण ओलं करण्याच्या सवयींवर उपाय काय ?
१. मुलांना चहा, कॉफी, बेकरी प्रॉडक्ट्स, जंक फूड, जास्त प्रमाणांत गोड पदार्थ देणे टाळावे. २. मुलांना संध्याकाळनंतर द्रव पदार्थ देणे टाळा पाणीसुद्धा आवश्यक असेल तरच द्यावे. ३. त्यांना रोज रात्री झोपण्याआधी बाथरुमला जाण्याची सवय लावावी. ४. मध्यरात्री आणि पहाटे अलार्म लावून कंटाळा न करता बाथरुमला घेऊन जावे.