Join us  

मुलांचं अभ्यासात लक्षच नसतं? आई बाबांनी कराव्या ७ गोष्टी, स्वत:हून मुलं अभ्यासाला बसतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 3:44 PM

Parenting Tips

अनेकजण असे असतात ज्याचं अभ्यासात मन लागत नाही. याचं सगळयात मोठ कारण लक्ष विचलित करणारे घरातील इतर घटक असतात.  शिक्षणाचे महत्व किती असते ते शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही. काही मुलं इच्छा असूनही व्यवस्थित वाचू लिहू शकत नाहीत कारण त्याचं अभ्यासात मन लागत  नाही. जर तुमच्या मुलानं चांगला अभ्यास करावा पुढे जावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही सोपे उपाय करून मुलांचा अभ्यासातील इंटरेस्ट वाढवू शकता. (The 7 Basic Mantra To Concentrate On Studies  Parenting Tips)

अभ्यासात मन लावण्याचे मूल मंत्र कोणते?

कोणतीही बोर्ड एक्जाम असो किंवा सरकारी नोकरीचा अभ्यास काही गोष्टी नेहमीच्या रूटीनमध्ये लक्षात ठेवून तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. या गोष्टी लक्षात ठेवल्यात तुम्ही सर्व काही विसरून आपल्या करीअरकडे लक्ष द्याल. त्यासाठी तुम्हाला ७ टिप्स फॉलो कराव्या लागतील याशिवाय मूल मंत्राचा जापही करावा लागेल. 

मूल मंत्र कोणते आहेत ते समजून घेऊ.

1) सगळ्यात आधी सुर्योद्य होण्याआधी अंथरूणातून उठा,

२) सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या.

३) नंतर वज्रासनात बसून राधा-राधा नावाचा १० मिनिटं जप करा.

४) जप केल्यानंतर ताज्या पाण्यानं अंघोळ करा.

५) त्यानंतर  १० मिनिटं व्यायाम करा. ही संपूर्ण क्रिया सुर्योद्य होण्याआधी पूर्ण करा.

६) यानंतर सात्विक आहार घ्या. 

७) नंतर आई-वडीलांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्या.

शाळा असो किंवा ट्यूशन कितीही चांगले असतली तर मुलांच्या अभ्यासात पालकांनी स्वत: इन्वॉल्ह होणं फार गरजेचं आहे. ही सवय पालकांची असेल तर मुलं कमीत कमी वेळात चांगले यश मिळवतील.  मुलं शाळेत जास्त एक्टिव्ह असतील तर त्यांचा होमवर्कसुद्धा पूर्ण असेल. रोज मुलांच्या वह्या पाहून त्यांना विचारा की अभ्यास कसा चालला आहे याशिवाय मुलांना जिथे मदत हवी असेल तिथे त्यांना मदत जरूर करा.

मुलं दिवसाचा जास्तीत जास्त एक्टिव्ह वेळ शाळेत घालवतात. म्हणून सतत मुलांच्या वर्गशिक्षकांच्या संपर्कात राहा. मुलांच्या सुधारणेला कुठे वाव आहे त्यांच्यात सुधारणा कुठे व्हायला हवी यावर अधिक भर द्या. पालक सभेला न चुकता जा.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं