बदलत्या वयानुसार मुलांमध्ये बरेच बदल घडतात (Parenting Tips). त्यानुसार पालकांनी मुलांचे संगोपन करयला हवे. बरेच पालक मुलं मोठे झाल्यानंतरही त्यांना लहान असल्यासारखं वागणूक देतात (Child - Parents bond). आपण आपल्या मुलाकडून, 'काय मम्मी - पप्पा माझ्या मित्रासमोर मला असं बोलू नका.' असं म्हणताना ऐकलं असेल.
अशावेळी मुलांना अपमानास्पद वाटू शकते. ज्यामुळे मुलांची चिडचिड होते. शिवाय मुलांचा कॉण्फिडन्सही कमी होतो. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर ही ४ वाक्य बोलणं टाळावे. ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होण्याऐवजी वाढेल. शिवाय त्यांना अपमानास्पद वाटणार नाही(Things parents should never say to their child).
अयशस्वी व्हाल
द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, 'आयुष्यात तुमचं काही पुढे होऊ शकणार नाही, अपयशी व्हाल' असे अनेक पालक आपल्या मुलांना म्हणतात. ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. या नकारात्मक गोष्टींमुळे मुळे निराश होतात.
तुमचा मित्र तुमच्यापेक्षा चांगला आहे
मुलं खोटं बोलतात-गोष्टी लपवतात? पालकांनी ३ चुका टाळायला हव्या, मुलं स्वत:हून बोलतील मनातलं..
आपल्या मुलांचे कोणाशीही तुलना करू नका. तुलनेमुळे मुलांमध्ये कमीपणाची भावना मनात येते. ते स्वतःच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात. ज्यामुळे कोणतीही गोष्ट करताना त्यांच्या मनात आधी नकारात्मक भावना येईल. प्रत्येक मुलांमध्ये विविध गुण असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाची तुलना करणे टाळावे.
चूक झाल्यास ओरडणे
बरेच जण मुलांनी चूक केल्यास ओरडतात किंवा हात उगारतात. ज्यामुळे मुलांच्या मेंटल हेल्थवर परिणाम होतो. अशावेळी मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो.
पावसाळ्यात मुलं अंथरुण ओलं करतात? ५ टिप्स, डॉक्टर सांगतात त्रास कमी करायचा तर..
अपेक्षा पूर्ण करत नाहीस
मुलांकडून अपेक्षा ठेवणे चांगले आहे पण तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादणे चुकीचे आहे. मुलांवर जास्त दबाव आणल्याने ते तणावग्रस्त होऊ शकतात. अशावेळी मुलांच्या मनामध्ये अपयशाची भावना निर्माण होते. त्यामुळे मुलांवर कधीही अपेक्षांचे ओझे टाकू नका.