Lokmat Sakhi >Parenting > बाबा झाला सुपरमॅन, मुलांनी फेकलेला चेंडू बसल्या बसल्या झटक्यात आणून देतो..बडे आरामसे, पाहा व्हिडिओ 

बाबा झाला सुपरमॅन, मुलांनी फेकलेला चेंडू बसल्या बसल्या झटक्यात आणून देतो..बडे आरामसे, पाहा व्हिडिओ 

Dad Playing With Kids: पळापळ न करता एकाच ठिकाणी बसून मुलांनी टोलवलेला चेंडू पुन्हा त्याच जागी कसा आणायचा, असा प्रश्न पडला असेल तर या बाबांनी शोधून काढलेली ही भन्नाट ट्रिक एकदा बघाच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 12:49 PM2022-07-02T12:49:31+5:302022-07-02T12:50:28+5:30

Dad Playing With Kids: पळापळ न करता एकाच ठिकाणी बसून मुलांनी टोलवलेला चेंडू पुन्हा त्याच जागी कसा आणायचा, असा प्रश्न पडला असेल तर या बाबांनी शोधून काढलेली ही भन्नाट ट्रिक एकदा बघाच.

This dad's hacks for bringing a ball from far away without moving from chair, Tricks for how to play easily with kids | बाबा झाला सुपरमॅन, मुलांनी फेकलेला चेंडू बसल्या बसल्या झटक्यात आणून देतो..बडे आरामसे, पाहा व्हिडिओ 

बाबा झाला सुपरमॅन, मुलांनी फेकलेला चेंडू बसल्या बसल्या झटक्यात आणून देतो..बडे आरामसे, पाहा व्हिडिओ 

Highlightsमुलांशी क्रिकेट पण खेळायचंय आणि स्वत:ची धावपळ पण होऊ द्यायची नाहीये, तर मग या एका अतिशय स्मार्ट असणाऱ्या बाबाचा व्हिडिओ तुम्ही बघायलाच हवा. 

लहान मुलांसोबत वेगवेगळे खेळ खेळणं हे काही चेष्टेचं काम नाही. यामध्ये स्वत:चं वय विसरून त्यांच्यासारखं लहान होऊन खेळावं लागतं. कधी त्यांच्यासारखं पळावं लागतं तर कधी चक्क गुडघ्यावर येऊन रांगावंही लागतं. त्यामुळे मुलांशी खेळताना दमछाक होते हे मात्र नक्की. आता जर मुलांनी बॅट- बॉल खेळायचा आग्रह धरला तर मग विचारून नका. स्वत: हातात बॅट घेऊन मुले उभी राहतात आणि मग त्यांना बॉलिंग करणं, त्यांनी टोलवलेला बॉल पळत जाऊन आणणं, ही सगळी कसरत पालकांनाच करावी लागते. (father playing cricket with kids)

 

या सगळ्या धावपळीमुळे मग मुलांसोबत असे पळापळीचे खेळ खेळणं अनेक पालकांना नकोसं वाटतं. आई किंवा वडील दोघांपैकी एक जण अंग काढून घेऊ शकतो, पण दुसऱ्याला मात्र मुलांची करमणूक केल्याशिवाय पर्यायच नसतो. म्हणूनच तर मुलांशी क्रिकेट पण खेळायचंय आणि स्वत:ची धावपळ पण होऊ द्यायची नाहीये, तर मग या एका अतिशय स्मार्ट असणाऱ्या बाबाचा व्हिडिओ (viral video) तुम्ही बघायलाच हवा. 

 

hindustantimes च्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर (instagram share) करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलं आणि त्यांचे बाबा परदेशी आहेत. बाबा एक खुर्ची टाकून मस्त निवांत बसला आहेत. त्याच्या बाजुला त्याची दोन मुलं खेळत आहेत. एका मुलाच्या हातात बॅट आहे आणि बाबाच्या हातात कसलं तरी यंत्र आहे. त्या यंत्राला इलॅस्टिकच्या मदतीने चेंडू बांधलेला आहे. मुलगा मस्तपैकी बॅट मारून तो चेंडू त्याला हवा तेवढा जोरात आणि हवा तेवढा दूर टोलवतो आहे आणि त्याचा बाबा ते यंत्र फिरवून तो चेंडू पुन्हा त्याच जागेवर आणतो आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी आणखी एक गंमत म्हणजे चेंडूची उंची बरोबर अशा पद्धतीने ठेवण्यात आली आहे की तो चेंडू मुलाला अगदी सहजपणे बॅटने मारता येईल. आहे की नाही कमाल... बाबाची हुशारी आणि एकाच जागी बसल्या- बसल्या मुलांना खेळविण्याची ट्रिक नेटकरींना भारीच आवडली आहे. 
 

Web Title: This dad's hacks for bringing a ball from far away without moving from chair, Tricks for how to play easily with kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.