Join us  

६ महिने ते २ वर्षे वयातल्या मुलांसोबत खेळा ३ भन्नाट खेळ, मुलांचा मेंदू होईल तल्लख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 11:28 AM

Three must-do activities for your 0-2-year-old child’s brain development : ६ महिने ते २ वर्षे या वयात मुलांच्या वाढीचा वेग जास्त असतो, त्या वयात खेळातून त्यांना काही गोष्टी सहज शिकवता येतात.

घरात लहान मूल जन्माला आलं की घरातील मंडळींसाठी त्याच्याशी खेळणं, त्याला रमवणं हे थोडं जिकरीचं असतं. बाळाची सवय मोडल्याने आजी-आजोबांनाही काही वेळा हे सगळं अवघड जातं. मूल पाळण्यात किंवा चटईवर पडून एकटं एकटं खेळतं तोपर्यंत ठिक असतं. पण एकदा ते ६ महिन्याचे झाले की ते रांगणे, पुढे सरकणे, उभे राहायचा प्रयत्न करणे अशा सगळ्या गोष्टी करायला लागते. मूल जन्माला यायच्या आधीपासूनच त्याच्या मेंदूचा विकास होण्यास सुरुवात झालेली असते. जन्मानंतरही जवळपास २० ते २५ वर्षांपर्यंत हा विकास होतच असतो. मात्र पहिल्या ५ ते ७ वर्षांमध्ये मेंदूचा विकास वेगाने होत असल्याने या विकासाला पूरक अशा गोष्टी करणे आवश्यक असते. पाहूयात मूल जन्माला आल्यापासून साधारण २ वर्षापर्यंत त्याच्यासोबत करता येतील अशा अॅक्टीव्हिटीज कोणत्या. या अॅक्टीव्हिटीज बाळाचे आई वडील, आजी आजोबा, घरातील इतर मंडळी असे सगळे अगदी सहज करु शकतात (Three must-do activities for your 0-2-year-old child’s brain development). 

(Image : Google)

१. शारीरिक हालचाली 

 बॉल किंवा साबणाचे बुडबुडे यांच्याशी खेळण्यासारख्या शारीरिक हालचाली. पहिल्या २ वर्षांत मुलांच्या शारीरिक क्षमता वेगाने वाढत असल्याने त्यांचा योग्य पद्धतीने विकास व्हावा यासाठी अशाप्रकारच्या हालचाली करणे अतिशय फायदेशीर ठरते. या शारीरिक हालचालींमुळे त्यांच्या मेंदूचा विकास वेगाने आणि चांगला होतो. यामध्ये आपण आणखीही बऱ्याच अॅक्टीव्हिटीजचा समावेश करु शकतो.     

२. बोलणे आणि हातवारे किंवा हावभाव करणे 

२ वर्षापर्यंतच्या बाळाला त्याच्या कानावर पडणारी भाषा शिकण्याची उपजत कला असते. तसंच त्यांना या काळात भाषेची भूकही जास्त असते. त्यामुळे आपण या काळात त्यांच्यासोबत जितकी गाणी म्हणू, गोष्टी सांगू, गप्पा मारु किंवा हावभाव करुन दाखवू तितके चांगले. कारण यामुळे त्यांची कल्पनाशक्ती तर वाढतेच पण त्यांच्या मेंदूचा विकास होण्यास मदत होते. 

३. संगीत आणि नृत्य 

मुलांना लहान वयात उपजत संगीत आणि नृत्याचे ज्ञान असते. या दोन्ही गोष्टींसाठी मेंदू आणि शरीराचे अवयव यांचे उत्तम को ऑर्डिनेशन यांची गरज असते. यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे या वयात मुलांना म्युझिक आणि डान्समध्ये जास्तीत जास्त एंगेज करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं