Lokmat Sakhi >Parenting > Tiffin Box Tips : स्टीलचे नको, प्लास्टिकचेच डबे मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी वापरता? ५ तोटे, तब्येतीसाठी मोठे धोके

Tiffin Box Tips : स्टीलचे नको, प्लास्टिकचेच डबे मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी वापरता? ५ तोटे, तब्येतीसाठी मोठे धोके

Tiffin Box Tips : गेल्या काही वर्षात प्लास्टीकच्या वस्तूंचा वापर वाढला असून ते आरोग्य आणि पर्यावरण अशा दोन्हीसाठी हानिकारक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 12:50 PM2022-06-07T12:50:34+5:302022-06-07T12:53:08+5:30

Tiffin Box Tips : गेल्या काही वर्षात प्लास्टीकच्या वस्तूंचा वापर वाढला असून ते आरोग्य आणि पर्यावरण अशा दोन्हीसाठी हानिकारक आहे.

Tiffin Box Tips: Don't use steel, do you use plastic boxes for children's school tiffins? 5 disadvantages, big health risks | Tiffin Box Tips : स्टीलचे नको, प्लास्टिकचेच डबे मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी वापरता? ५ तोटे, तब्येतीसाठी मोठे धोके

Tiffin Box Tips : स्टीलचे नको, प्लास्टिकचेच डबे मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी वापरता? ५ तोटे, तब्येतीसाठी मोठे धोके

Highlightsडबा स्टीलचा असेल तर अन्न खराब होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी असते. पर्यावरणाची हानी होत असल्याने शक्यतो प्लास्टीक वापरणे टाळलेले केव्हाही चांगलेच. 

शाळा सुरू झाली की नवीन ड्रेस, बूट, दप्तर, वह्या पुस्तकं याबरोबरच आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीची खरेदी केली जाते. ती म्हणजे जेवणाचा आणि खाऊचा डबा. मुलांना शाळा सुरू झाली की सगळं नवीन हवं असतं. त्यातही गेले २ वर्ष कोरोनामुळे शाळा ऑनलाइन असल्याने यंदा सगळीच खरेदी नव्याने सुरू झाली आहे. मूल मोठं होऊ लागलं की त्यांना त्यांची आवडनिवड असते. त्यामुळे अनेकदा त्यांच्या आवडीनुसार आपण वस्तू घेतो. पण डबा हा थेट आरोग्याशी निगडीत असल्याने ती खरेदी करताना आपण सतर्क असायला हवं. हल्ली बाजारात प्लास्टीकच्या वस्तू मोठ्या प्रमाणात मिळतात (Tiffin Box Tips). धातूपेक्षा त्या तुलनेने स्वस्त असल्याने त्यालाच प्राधान्य दिले जाते. प्लास्टीकच्या डब्यांमध्ये मुलांना आकर्षित करणारे वेगवेगळे आकार, रंग असल्याने तसेच ते हाताळायला सोपे असल्याने त्यालाच जास्त पसंती दिली जाते. मात्र अशाप्रकारे प्लास्टीकच्या डब्यांचा वापर आरोग्यासाठी नक्कीच घातक ठरु शकतो. यापेक्षा स्टीलचा डबा हा प्लास्टीकला उत्तम पर्याय असू शकतो. त्यामुळे मुलांबरोबरच आपणही स्टीलच्या डब्यांचा विचार अवश्य करायला हवा. 

(Image : Google)
(Image : Google)

प्लास्टीकच्या डब्याचे तोटे 

१. आपण सकाळच्या घाईत अनेकदा गरम अन्न डब्यात भरतो. अशाप्रकारे गरम गोष्टी डब्यात भरल्यास त्यामुळे प्लास्टीक वितळून ते अन्नात एकत्र होते. अशाप्रकारे प्लास्टीक अन्नसोबत पोटात जाणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरु शकते. यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्ही एखादवेळी प्लास्टीकचा डबा वापरत असाल तर या डब्यांमध्ये गरम अन्न अजिबात भरु नये.

२. प्लास्टीकच्या डब्यांच्या झाकणांना एकप्रकारची खाच असते. यामध्ये अन्न अडकून बसते. इतकेच नाही तर हे डबे घासले तरी या डब्याला अन्नाचा वास, रंग तसाच राहतो. शिळ्या अन्नाचे कण त्यामध्ये तसेच राहीले आणि नवीन अन्न त्यावर भरले गेले तर पोटासाठी ते चांगले नसते. त्यामुळे प्लास्टीकचे डबे टाळलेले बरे.

३. दमट हवामानात प्लास्टीकच्या डब्यात अन्न बराच काळ राहील्यास त्याला वास येण्याची शक्यता असते. हे प्लास्टीक कमी दर्जाचे असेल तर हा वास बराच काळ तसाच राहतो. मात्र हाच डबा स्टीलचा असेल तर अन्न खराब होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी असते. 

४. प्लास्टीकच्या डब्याचे झाकण कितीही घट्ट लावले तरी त्यातून पातळ पदार्थ सांडण्याची, डब्याबाहेर येण्याची शक्यता असते. यामुळे डब्याची पिशवी, दप्तर किंवा बॅग तर खराब होतेच. पण अन्न वाया जाते आणि आपल्यालाही खाता येत नाही. स्टीलच्या डब्याचे झाकण घट्ट असल्याने किंवा त्याला कड्या असल्याने त्यातून सांडण्याची शक्यता तुलनेने कमी असते. 

५. प्लास्टीक वापरण्याचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा तोटा म्हणजे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण वापरत असलेल्या प्लास्टीकचे अनेकदा विघटन होतेच असे नाही, प्लास्टीकचे डबे थोडा काळ वापरुन टाकून दिले जातात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने शक्यतो प्लास्टीक वापरणे टाळलेले केव्हाही चांगलेच. 

 

Web Title: Tiffin Box Tips: Don't use steel, do you use plastic boxes for children's school tiffins? 5 disadvantages, big health risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.