Lokmat Sakhi >Parenting > लहान मुलांच्या शाळेचा लंच बॉक्सही हवा हेल्दी, छोट्या चुकांमुळे मुलांची खुंटते वाढ-उंचीही वाढत नाही

लहान मुलांच्या शाळेचा लंच बॉक्सही हवा हेल्दी, छोट्या चुकांमुळे मुलांची खुंटते वाढ-उंचीही वाढत नाही

Children Lunch Box Tips : लहान मुलांचा लंच बॉक्स तयार करताना कशाची काळजी घ्यावी हे जाणून घेऊन, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:11 IST2025-04-16T15:49:31+5:302025-04-16T18:11:51+5:30

Children Lunch Box Tips : लहान मुलांचा लंच बॉक्स तयार करताना कशाची काळजी घ्यावी हे जाणून घेऊन, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील.

Tiffin rules to follow while packing lunch box for kids | लहान मुलांच्या शाळेचा लंच बॉक्सही हवा हेल्दी, छोट्या चुकांमुळे मुलांची खुंटते वाढ-उंचीही वाढत नाही

लहान मुलांच्या शाळेचा लंच बॉक्सही हवा हेल्दी, छोट्या चुकांमुळे मुलांची खुंटते वाढ-उंचीही वाढत नाही

Children Lunch Box Tips : लहान मुलांच्या एकंदर वाढीसाठी त्यांच्या खाण्या-पिण्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. हे काही कुणाला वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे मुलांना शाळेतही सोबत लंच बॉक्स दिला जातो. इतकंच नाही त्यात असे पदार्थ देण्याचा प्रयत्न असतो जे पौष्टिक आणि एनर्जी देणारे असतील. अशात मुलांना लंच बॉक्स देताना काही गोष्टींची खास काळजी घेणंही गरजेचं असतं. लहान मुलांचा लंच बॉक्स तयार करताना कशाची काळजी घ्यावी हे जाणून घेऊन, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील.

अ‍ॅल्यूमिनिअम फॉइल टाळा

चपाती किंवा सॅंडविच पॅक करण्यासाठी आज भरपूर घरांमध्ये अ‍ॅल्यूमिनिअम फॉइलचा वापर केला जातो. यानं पदार्थ जरी फ्रेश राहत असला तरी आरोग्यासाठी ते अजिबात चांगलं नाही. हेल्थ एक्सपर्टनुसार, जेव्हा तुम्ही अ‍ॅल्यूमिनिअम फॉइलमध्ये जेवण पॅक करता तेव्हा उष्णतेमुळे त्यातील अ‍ॅल्यूमिनिअमचे कण जेवणाला लागू शकतात. यानं किडनी, स्मरणशक्ती, इम्यूनिटी, हाडं आणि पचन तंत्र कमजोर होऊ शकतं. 

नॉनस्टिक भांड्यांचा वापर टाळा

लहान मुलांसाठी जास्तीत जास्त घरांमध्ये पॅनकेक, पराठे किंवा घावणे बनवले जातात. तुम्ही सुद्धा हेच पदार्थ बनवत असाल तर यासाठी नॉनस्टिक पॅनचा वापर अजिबात करू नये. याजागी लोखंडी भांड्यांचा वापर करावा. नॉनस्टिक पॅनमध्ये सिंथेटिक पॉलिमर असतं. अशात जेव्हा पॅनला जास्त आस लागते तेव्हा यातून निघणारं केमिकल आणि धुरामुळे हृदयरोग, इनफर्टिलिटी, श्वासासंबंधी समस्या आणि थायरॉइड डिसऑर्डरसारख्या समस्या होऊ शकतात.

ना बिस्कीट ना बेकरी फूड

बिस्किट, बेकरी फूड लहान मुलांना अधिक आवडतात. पण त्यांना लंच बॉक्समध्ये कधीही बिस्किट किंवा बेकरी फूड देऊ नये. हे पदार्थ त्यांची तब्येत बिघडवू शकतात. यांमध्ये भरपूर मैदा, शुगर, आर्टिफिशिअल फ्लेवर, कलर आणि पाम ऑइल असतं. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. अनेकदा लहान मुलं एकाच वेळी बिस्किटचं पूर्ण पॅकेट खातात. त्यामुळे या गोष्टी लंच बॉक्समध्ये अजिबात देऊ नका.

हायड्रेशनची योग्य काळजी

पोषक पदार्थांसोबतच पाणीही महत्वाचं असतं. त्यांना सोबत पाण्याची बॉटल द्या आणि आवर्जून सांगा की, शाळेतच बॉटलमधील सगळं पाणी संपवायचं आहे. जर मुलांना आधीपासूनच हेल्दी सवयी लावल्या तर त्या नेहमीसाठी त्यांच्या लक्षात राहतात. दिवसभर एनर्जीसाठी त्यांनी भरपूर पाणी पिणं आवश्यक असतं.

जास्त साखर टाळा

अर्थातच लहान मुलांना गोड पदार्थ खूप आवडतात. पण तुम्हालाही माहीत असेल की, जास्त गोड खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. जेव्हा लहान मुलं जास्त गोड पदार्थ खातात तेव्हा त्यांची एनर्जी एकाएकी डाउन होते. ज्यामुळे ते अभ्यासावर फोकस करू शकत नाहीत आणि आरोग्य बिघडतं. त्यामुळे लंच बॉक्समध्ये त्यांना जास्त गोड पदार्थ देणं टाळलं पाहिजे.

Web Title: Tiffin rules to follow while packing lunch box for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.