Join us  

कितीही पाठ केलं तरी मुलं लगेच विसरतात? ४ ट्रिक्स-डोक्यात सगळं लॉक होईल-काहीच विसरणार नाहीत मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 5:03 PM

Tips And Tricks Right Way To Study To Remember : सतत अभ्यास केल्यानं मेंदू थकतो आणि लक्ष भटकू लागते. म्हणूनच अभ्यास करतान छोटे छोटे ब्रेक घ्या.

एकदा वाचलं आणि नंतर लगेच विसरलो  हा प्रोब्लेम अनेकांचा असतो. वाचलेलं किंवा पाठ केलेलं जास्त लक्षातच राहत नाही अशी तक्रार अनेकजण करतात. (Parenting Tips) जर तुम्ही एकदा वाचलेल्या गोष्टी जास्तवेळ लक्षात ठेवू इच्छित असाल तर अभ्यासाच्या पद्धतीत  काही बदल तरून तुम्ही अभ्यास व्यवस्थित करू शकता.  मेंदूमध्ये कोणतीही माहिती कंम्प्यूटरप्रमाणे सेव्ह करणं अगदी सोपं आहे. ज्यामळे दीर्घकाळ काही गोष्टी तुमच्या मेंदूमध्ये स्टोअर राहतील.  ४ सोपे उपाय केल्यानंतर तुमचा मेंदू चांगला चालेल. वाचलेलं विसरायला होणार नाही. (Right Way To Study To Remember For Long Term For Better Memory)

ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल इज्यूकेशन ग्रुपच्या रिपोर्टनुसार मेंदू शार्प होण्यासाठी आणि पाठ केलेलं लक्षात राहण्यासाठी तुम्ही जे काही वाचताय ते मोठ्यानं वाचा तुमचा आवाज तुमच्या कानांना ऐकू  आला तर बरोबर सर्वकाही लक्षात राहील, चांगली झोप घ्या ज्यामुळे एकाग्रता चांगली राहते. सतत नवनवीन गोष्टी शिकत राहण्याचा प्रयत्न करा, रोज ठराविक वेळेतच अभ्यास करा. गरजेपेक्षा जास्तवेळ अभ्यास कराल तर अभ्यासात मन लागणार नाही आणि लक्ष विचलित होईल. आठवड्यातून एकदातरी ग्रुप स्टडी करा म्हणजे तुमच्या  शाळेतील आणि क्लासमधील मित्र मैत्रिणीसोबत अभ्यास, पाठांतर करा.

1) रिव्हिजन

जेव्हाही तुम्ही अभ्यास  कराल तेव्हा काही मिनिटं वाचलेल्या गोष्टी रिव्हाईज किंवा रिकॉल करायला विसरू नका. नेहमी पेन, पेन्सिल घेऊन बसा आणि महत्वाच्या गोष्टी अंडरलाईन करा. तुम्ही ठरलेल्या वेळी काही गोष्टी नियमित कराल तर लक्षात राहतील.

2) वाचलेल्या गोष्टी समजून घ्या

तुम्ही अभ्यास करताना जे काही वाचता ते समजून घेण्याचा प्रयत्न  करा. यासाठी नोट्स तयार करा आणि प्रश्न विचारा  तुम्ही जे काही वाचलंय ते शांत बसून आत्मसाद करण्याचा प्रयत्न करा.  यामुळे तुमचा मेंदू चांगला राहण्यास मदत होईल.

3) अभ्यास करताना ब्रेक गरजेचा

सतत अभ्यास केल्यानं मेंदू थकतो आणि लक्ष भटकू लागते. म्हणूनच अभ्यास करतान छोटे छोटे ब्रेक घ्या. यामुळे मेंदू रिलॅक्स राहण्यास मदत होते आणि नवीन माहिती प्रोसेस करण्याचा वेळही मिळतो. 

4) व्हिज्युलायजेशन

जेव्हाही तुम्ही काही नवीन वाचाल तेव्हा चित्र किंवा मॅप पाहून व्हिज्युअलाईज करा. ज्यामुळे गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतील आणि मेंदूच्या चित्राबरोबरच सर्व गोष्टी व्हिज्यूअलाईज राहतील. या टेक्निक्स वापरून तुम्ही दीर्घकाळ काही गोष्टी लक्षात ठेवू शकता. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं