Join us  

कितीही सांगा, मुलं अभ्यासच करत नाहीत, लक्षात ठेवा ४ गोष्टी - न ओरडता होईल छान अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 10:16 AM

Tips For Parents To Make Children Study : अभ्यासाचे महत्त्व पटवून द्यायचे असेल तर काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात

ठळक मुद्देकोणत्या वेळेला कोणत्या वाराला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा याचे टाइम टेबल तयार करण्यासाठी मुलांना मदत करा. दबाव टाकणे मुलांच्या विकासासाठी किंवा त्यांना त्या विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी घातक ठरु शकतो

अभ्यास म्हटला की मुलांना अजिबात नको असतो. खेळायचं, खाऊ खायचा, फिरायला जायचं, मोबाइल किंवा टिव्ही पाहायचा ही त्यांची अतिशय आवडीची कामं. पण पालकांना मात्र आपल्या मुलांनी अभ्यास करावा आणि कायम चांगले मार्क मिळवावेत असेच वाटत असते. पालकांच्या दृष्टीने ते योग्य असले तरी अभ्यासाचे महत्त्व मुलांना मात्र लहान वयात समजत नाही. मुलांनी अभ्यास केला पाहिजे असा पालकांचा अट्टाहास असतो आणि मुलं मात्र काही केल्या ऐकत नाहीत. मग त्यावरुन घरोघरी वाद, भांडणं, मुलांना दिलेला मार आणि मग त्यावरुन रडारडी असं सगळं सतत सुरू असतं. पण मुलांना वेळीच अभ्यासाचे महत्त्व पटवून द्यायचे असेल तर काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात त्या कोणत्या ते पाहूया (Tips For Parents To Make Children Study)...

(Image : Google)

१. कौतुक करा आणि बक्षीस द्या

लहान मुलांना किंवा अगदी कोणालाही आपलं कोणी कौतुक केलं की छान वाटतं. कौतुक केल्याने मुलांना प्रोत्साहन तर मिळतेच पण कोणतीही गोष्ट ते जास्त उत्साहाने छान करतात. एखादवेळी मुलांना त्यांनी केलेल्या गोष्टीसाठी बक्षीस दिलं तर त्याचं त्यांना विशेष अप्रूप वाटतं. त्यामुळे योग्य वेळी मुलांचे कौतुक करणे, मुलांना बक्षीस देणे अतिशय गरजेचे असते. 

२. विचलन होणार नाही असे बघा 

मुलांना अभ्यास करताना इतर गोष्टींमुळे ते विचलित होणार नाहीत असे बघा. टीव्ही किंवा मोबाइल या गोष्टी मुलांचे लक्ष विचलीत होण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असतात. अभ्यासाच्या वेळी या गोष्टी त्यांच्याजवळ नसतील याची काळजी घ्या. तसेच घरात सतत माणसे येत असतील किंवा आजुबाजूला खूप आवाज असतील तर त्यांना एखाद्या शांत ठिकाणी अभ्यासाला बसवा. 

३. जास्त दबाव देऊ नका

काही घरांमधून मुलांना अभ्यासासाठी प्रमाणापेक्षा खूप जास्त दबाव दिला जातो. असा दबाव टाकणे मुलांच्या विकासासाठी किंवा त्यांना त्या विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी घातक ठरु शकतो. त्यामुळे मुलांवर जास्त दबाव टाकू नका. 

(Image : Google)

४. नियोजन करण्यात त्यांची मदत करा

मुलांना अभ्यासाचे नियोजन कसे करायचे ते शिकवा. दिवसातील कोणत्या वेळेला कोणत्या वाराला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा याचे टाइम टेबल तयार करण्यासाठी मुलांना मदत करा. या नियोजनात त्यांना काही अडचण येत असेल तर त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्या सोबत राहा. यामुळे त्यांचे नियोजन आणि अभ्यास चांगला होण्यास नक्कीच मदत होईल. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंशाळा