Join us  

Tips to encourage your Child to eat more Vegetables : मुलं भाजीच खात नाहीत, 4 सोपे उपाय- भरपूर भाज्यांचं पोषण-मुलं खातात आवडीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 11:12 AM

Tips to encourage your Child to eat more Vegetables : भाज्या नीट खाल्ल्या नाहीत तर प्रतिकारशक्ती कमी राहते आणि सतत काही ना काही कुरबुरी मागे लागतात.

ठळक मुद्देरोज तिच ती भाजी-पोळी देण्यापेक्षा त्यातच थोडा वेगळा प्रयोग केला तर मुलांच्या पोटात भाज्या जाणं सहज शक्य आहे.मुलांनी भाजीचा डबा तसाच आणू नये यासाठी आईने कोणते पर्याय ककरावेत याविषयी

आता जवळपास सगळ्या मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोविडमुळे झालेल्या २ वर्षांच्या गॅपनंतर शाळेत जाणे ही मुलांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. पालकांसाठीही मुलांचे रुटीन सुरू होणे ही काहीशी दिलासादायक बाब आहे. नव्याने शाळा सुरू होणार म्हणून दप्तर, कपडे, वह्या-पुस्तके या सगळ्याची खरेदी झाली असणार. याबरोबरच मुलांच्या आवडीच्या आकाराचा आणि रंगाचा डबाही एव्हाना घेतला गेला असणार. (Tips to encourage your Child to eat more Vegetables) डबा कितीही आवडीचा असला तरी त्यात दिली जाणारी पोळी-भाजी आवडीची नसल्याने मुलं हमखास भाजीचा डबा तसाच घरी आणतात. मग आईचा ओरडाही खातात. 

घरात जेवत असतील आणि भाजीला नाही म्हटले तर आपण दटावून त्यांना ती खायलाच लावतो. नाहीच ऐकले तर कोशिंबीर, लोणचं, चटणी, आमटी असं काही ना काही देऊन त्यांना पोषण मिळेल असा प्रयत्न करतो. पण शाळेच्या डब्यात असा कोणताच पर्याय नसल्याने त्यांनी भाजी खाल्लीच नाही की आपल्याकडे कोणताही पर्याय नसतो. भाजी कितीही छान, मुलांच्या आवडीची केली तरी ते खातच नाहीत. दिवसभराची इतकी दमणूक झाल्यावर पोटात नीट अन्न गेलं नही तर वाढत्या वयात शरीराला पोषण कसं मिळणार म्हणून पालक मात्र चिंतेत असतात. भाज्या नीट खाल्ल्या नाहीत तर प्रतिकारशक्ती कमी राहते आणि सतत काही ना काही कुरबुरी मागे लागतात. पण मुलांनी खावी म्हणून काय पर्याय करता येतील याविषयी...

१. भाज्यांचे पराठे

साधारणपणे मुलं पराठ्याला नाही म्हणत नाहीत. आपण साधारणपणे मेथी, पालक, बटाटा यांचे पराठे करतो. पण त्याशिवाय आपण कोबी, बीट, गाजर, दुधीभोपळा, कोथिंबीर अशा सगळ्या भाज्या किसून पराठे करु शकतो. यासोबत दही, सॉस किंवा चटणी दिली तर मूल आवडीने डबा खाते. त्यामुळे घरात असतील त्या भाज्या कणकेत किसून घालायच्या, त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट घालून पराठा करुन द्यायचा.

२. पावभाजी, मॅगी, पिझ्झा मसाला

आपलं मूल कोणत्या भाज्या खात नाही किंवा कोणत्या भाजीला नाक मुरडते हे साधारणपणे आपल्याला माहित असते. त्यामुळे मूल जी भाजी खात नाही त्या भाजीला मुलांना आवडेल असा एखादा मसाला घालून ती भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने करायची. साधारणपणे मुलांना मॅगी, पिझ्झा, पावभाजी या गोष्टी आवडीच्या असतात. मुलांना ती भाजी स्मॅश करुन त्यामध्ये त्यांच्या आवडीचा एखादा मसाला घालून दिल्या मुलं आवडीने ती भाजी संपवतील 

३. पनीर, टोफू, मशरुम

पनीर, मशरुम आणि टोफू हे तिन्ही प्रोटीन आणि जीवनसत्त्वे मिळण्याच्यादृष्टीने अतिशय चांगले असते. मुलांना डब्यात आठवड्यातून एकदा आवर्जून या गोष्टी द्यायला हव्यात. यामध्ये मूल जी भाजी खात नसेल तरी घालून त्यांना कळणार नाही अशापद्धतीने करावी. तसेच या गोष्टी मुलं साधारणपणे हॉटेलमध्ये खातात. त्यामुळे आईने आपल्याला हॉटेलसारखी भाजी दिली असं मुलांना वाटतं आणि ते डबा संपवतात. 

(Image : Google)

४. सामोसा किंवा फ्रँकी 

एखादवेळी मुलांच्या आवडीची भाजी नसेल तर ती भाजी पोळीमध्ये भरुन त्यावर परतलेला कांदा घालावा. त्यावर घरात उपलब्ध असेल तर चीज, पनीर घालावे. वरुन टोमॅटो केचअप घालून त्याची फ्रँकी किंवा सोमोसाचा आकार करुन ते शॅलो फ्राय करावे. असे करुन दिल्यास मुलांना पोळी-भाजीशिवाय काहीतरी वेगळं दिलं आहे असं वाटतं आणि हा आगळावेगळा प्रकार ते अतिशय आवडीने खातात.  

टॅग्स :पालकत्वभाज्यालहान मुलंकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.शाळा