Lokmat Sakhi >Parenting > मुलं ५ मिनीटही एका जागी बसत नाहीत? एकाग्रता वाढवण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी...

मुलं ५ मिनीटही एका जागी बसत नाहीत? एकाग्रता वाढवण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी...

Tips To Increase Child Concentration Parenting Tips : एकाग्रता चांगली असेल तरच एखादी अॅक्टीव्हिटी करणे किंवा अभ्यास करणे सोपे जाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 03:38 PM2023-01-17T15:38:46+5:302023-01-17T15:52:05+5:30

Tips To Increase Child Concentration Parenting Tips : एकाग्रता चांगली असेल तरच एखादी अॅक्टीव्हिटी करणे किंवा अभ्यास करणे सोपे जाते.

Tips To Increase Child Concentration Parenting Tips : Children do not sit still for 5 minutes? Just 4 things to do to increase concentration... | मुलं ५ मिनीटही एका जागी बसत नाहीत? एकाग्रता वाढवण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी...

मुलं ५ मिनीटही एका जागी बसत नाहीत? एकाग्रता वाढवण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी...

Highlightsमुलांना एखादी गोष्ट शिकवायची तर त्यासाठी पेशन्स आवश्यक असतातकाही गोष्टी पालक म्हणून आपण लक्षात घेऊन योग्य पद्धतीने केल्या तर त्याचा फायदा होतो

मुलांनी एकाजागी बसावं आणि दिलेली गोष्ट शांतपणे पूर्ण करावी असं आपल्याला वाटत असतं. पण मुलं सतत काही ना काही कारण काढून उठतात आणि सांगितलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी वेळ लावतात. मग तो अभ्यास असो किंवा एखादी अॅक्टीव्हिटी. एकाग्रता कमी पडत असल्याने मुलं असं करतात. याचा परिणाम म्हणजे ते अभ्यासावर तर लक्ष केंद्रित करु शकत नाहीतच पण लक्षपूर्वक एखादी गोष्ट करणे अशा मुलांना अवघड जाते. आता मुलांची एकाग्रता वाढावी यासाठी काय करावं असा प्रश्न पालकांसमोर असतो. यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स आपण आज पाहणार आहोत (Tips To Increase Child Concentration Parenting Tips). 

एकाग्रता नसण्याची २ महत्त्वाची कारणं 

१. अभ्यास करत असलेल्या खोलीत लक्ष विचलीत करणाऱ्या गोष्टी असणे.

(Image : Google)
(Image : Google)

२. अभ्यासातील संकल्पना योग्य रितीने न समजणे 

उपाय 

१. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीतपासून टिव्ही, मोबाईल, खेळणी अशा लक्ष विचलीत करणाऱ्या गोष्टी दूर ठेवणे. त्यामुळे मुले अभ्यासाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष एकाग्र करु शकतील.

२. ज्या विषयाचा अभ्यास करत असतील त्याच्या नोटस मुलांना काढायला सांगा. लिहीण्यामुळे मुलांची एकाग्रता वाढायला मदत होते आणि जे लिहीत आहोत ते समजणे सोपे होते. 

३. अभ्यासाला सुरुवात करताना मुलांना आवडणाऱ्या विषयांचा आधी अभ्यास करायला सांगा. तसेच गणिताचा अभ्यास करत असेल तर आधी येत असणारी गणिते सोडवायला सांगा. त्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. 

४. अभ्यासाचे सेशन्स कमी वेळाचे म्हणजे २० मिनीटांचे ठेवा. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे २० मिनीटे एका जागी बसणे आणि एखादी गोष्ट करणे हा मुलांसाठी मोठा टास्क असू शकतो. त्यापेक्षा जास्त वेळ मुले एका जागी बसू शकत नाहीत. त्यामुळे २० मिनीटांनी ब्रेक घ्या. 
 

Web Title: Tips To Increase Child Concentration Parenting Tips : Children do not sit still for 5 minutes? Just 4 things to do to increase concentration...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.