जर तुम्हीही एक पालक असाल तर आपल्या मुलांची वाढ व्यवस्थित व्हावी त्यांच्या शरीरात कोणत्याच गोष्टींची कमतरता भासू नये असं तुम्हालाही वाटत असणार. (Brain Development in Kids) लहानपणापासूनच त्यांचा आहार चांगला असेल तर तब्येतही चांगली राहते. (Mulanchya menducha vikas honyasathi kay karave) बाल्यावस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत मुलांचा मेंदू 80 टक्के वाढलेला असतो. मेंदूचे वेगवेगळे भाग तरूण वयात येईपर्यंत विकसित होत असतात. जसं की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ज्याला 'पर्सनॅसिटी कोर' असंही म्हणतात. (What Foods Are Good For Brain Development in Kids)
नियोजन, स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्यासारख्या क्रियांसाठी मेंदूचा हा भाग जबाबदार असतो. मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी आणि माईंड शार्प होण्यासाठी पोषण महत्वाचे आहे असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. काही पोषक खाद्यपदार्थ मेंदूच्या वाढीस पोत्साहन देतात. मुलांच्या मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी काही सुपरफूडची यादी पाहूया. (Foods to Increase Yoir Kid's Brain and Memory Power)
१) हिरव्या भाज्या
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार मुलांना भाज्या खाऊ घालणं हा मोठा टास्क आहे पण भाज्यांच्या सेवनाने त्यांच्या मेंदूला पुरेपूर पोषण मिळते. पालक, केल, लेट्यूस या भाज्यांमध्ये व्हिटामीन के आणि व्हिटामीन ई असते. ल्युटीन आणि झेक्सान्सथिन सारखी तत्व यात असतात. ज्यामुळे मेंदूबरोबच डोळेही चांगले राहतात.
२) ग्रीक योगर्ट
मेडीकल न्यूज टु डे च्या अहवालात नमूद केले आहे की रिसर्चनुसार मायक्रोबायमचा मेंदूच्या विकासासाठी महत्वाचा रोल असतो. आंबवलेल्या पदार्थांमध्ये प्रिबायटोटिक्स जास्त असतात. यातून पोषण मिळते. लहान मुलांच्या आहारात फळांसह ग्रीक योगर्टचा समावेश केल्यास मेंदूच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.
३) ड्रायफ्रुट्स
काजू, बदाम, मनुके, पिस्ता, अक्रोड यांसारखे ड्रायफ्रुट्स मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात. जर मुलांना दुधाबरोबर ड्रायफ्रुट्स खायला दिले तर याचा दप्पट फायदा होईल. रात्री बदाम भिजवून सकाळी रिकाम्यापोटी मुलांना खायला द्या. यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास होण्यास मदत होईल.
४) बेरीज
स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी व्यतिरिक्त चेरीसुद्धा मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात. स्ट्रॉबेरी आणि ब्लु बेरीमध्ये एंटी ऑक्सिडेंसचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.
मुलांना चांगलं वळण लागावं असं वाटतं? वाचा सुधा मुर्तींनी पालकांना दिलेल्या ६ खास टिप्स
५) भोपळ्याच्या बीया
भोपळ्याच्या बियांमध्ये जिंक, आयर्न, कॉपर अशी तत्व असतात. यात अनसॅच्युरेडेट फॅट्ही असतात. ज्यामुळे मुलांचा मेंदू चांगल्या पद्धतीने कार्य करतो आणि शरीराचा विकासही चांगला होतो. म्हणून मुलांना रोज चमचाभर भोपळ्याच्या बीया खायला दया.