Lokmat Sakhi >Parenting > मोठं होऊन मुलांनी भरपूर यश मिळवावं असं वाटतं? पालकांनी करायला हव्या ५ गोष्टी

मोठं होऊन मुलांनी भरपूर यश मिळवावं असं वाटतं? पालकांनी करायला हव्या ५ गोष्टी

Top 5 Parenting Tips : मुलं मोठी होताना जे काही शिकतात किंवा आई वडीलांकडून त्यांना जे काही मिळते यामुळे त्यांच्या जीवनाचा एक साचा तयार होत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 02:26 PM2024-04-05T14:26:46+5:302024-04-05T15:11:21+5:30

Top 5 Parenting Tips : मुलं मोठी होताना जे काही शिकतात किंवा आई वडीलांकडून त्यांना जे काही मिळते यामुळे त्यांच्या जीवनाचा एक साचा तयार होत असतो.

Top 5 Parenting Tips To Keep In Mind If You Want Your Child To Become Successful In Future | मोठं होऊन मुलांनी भरपूर यश मिळवावं असं वाटतं? पालकांनी करायला हव्या ५ गोष्टी

मोठं होऊन मुलांनी भरपूर यश मिळवावं असं वाटतं? पालकांनी करायला हव्या ५ गोष्टी

प्रत्येक आई वडीलांची अशी इच्छा असते की मोठं होऊन त्यांच्या मुलांनी एक यशस्वी, जबाबदार व्यक्ती बनावं जेणेकरून त्यांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. (Top 5 Parenting Tips) तुम्ही मुलांची काळजी कशी घेता यावर मुलांच्या भविष्याचा पाय रोवला जातो.  मुलं मोठी होताना जे काही शिकतात किंवा आई वडीलांकडून त्यांना जे काही मिळते यामुळे त्यांच्या जीवनाचा एक साचा तयार होत असतो. चांगल्या संस्कारांमुळे भविष्यात मुलं यशस्वी होऊ शकतात. (5 Parenting Tips To Keep In Mind If You Want Your Child To Become Successful In Future)

१) परफेक्शनच्यामागे धावू नका

मुलांना नेहमीच सगळ्याच गोष्टी परफेक्ट असाव्यात असं शिकवलं जातं. पण परफेक्शनच्या मागे धावत असताना मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो. इतंकच नाही तर इंजायटी आणि स्ट्रेससुद्धा येऊ शकतो.  भविष्यात इतर समस्या उद्भवू शकतात.

२) आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा

आई वडीलांना नेहमीच असं वाटतं की आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा. आपल्या आवडीच्या गोष्टी करताना मुलं त्याची मस्करी करतात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. अशा स्थितीत आई वडीलांनी नेहमीच मुलांचा आत्मविश्वास  डगमगणार नाही याची काळजी घ्यावी. 

३) शिस्त लावणं महत्वाचे

आयुष्यात शिस्त नसणं अनेक समस्यांचे कारण ठरू शकते. मुलं जर शाळेत वेळेवर  जात नसतील  किंवा होमवर्क संपवत नसतील तर मोठं होऊन मुलं ऑफिसला किंवा इतर कामाच्या ठिकाणी उशीरा जाऊ शकतात. डेडलाईन्स पाळणार नाही. म्हणूनच मुलांना लहानपणापासून शिस्त लावणं गरजेचं आहे. मुलांना मारून-ओरडून शिकवण्यापेक्षा शांतपणे शिकवा. 

४) मुलांना वेळ द्या

मुलांच्या जडणघडणीत आई-वडीलांची उपस्थिती फार महत्वाची असते. मुलांना वेळ द्या, त्यांच्या समस्या, विचार समजून घ्या आणि तुमचं मत व्यक्त करा. मुलांबरोबर सोबत जा. मुलांच्या आवडीने गोष्टी केल्यास घरात सकारात्मक वातावरण राहतं. जे मुलांच्या विकासासाठी गरजेचे असते. 

५) रोल मॉडेल बना

असं पाहिलं जातं की पालक मुलांना एखादी गोष्टी करायला  नको म्हणतात आणि स्वत: तसं करतात. असं करण्यापेक्षा मुलांसाठी एक चांगला रोल मॉडेल बना. मुलांसमोर रागवण्यापेक्षा किंवा खोट बोलण्यापेक्षा जसं मुलांनी वागावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्हीही वागा.  तेव्हाच मूल चांगली व्यक्ती बनेल.

Web Title: Top 5 Parenting Tips To Keep In Mind If You Want Your Child To Become Successful In Future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.