Join us  

मुलांचं पुढचं पाठ मागचं सपाट होतं? ६ पदार्थ खायला द्या, सगळं तोंड पाठ होईल-स्मरणशक्ती वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 9:09 AM

Top 6 Brain Foods for Children : दूधात कॅल्शियम आणि व्हिटामीन्स असतात जे  हाडांच्या विकासास मदत करतात. दूधात फॉस्फरेस आणि व्हिटामीन डी असते.

लहान मुलं एखादी वाचलेली किंवा ऐकलेली गोष्ट जितक्या लवकर लक्षात ठेवात तितक्या लवकर ते विसरतातही.(Parenting Tips) अनेक पालकांची अशी तक्रार असते की मुलं पाठांतर केलेलं आयत्यावेळी सर्व विसरतात. ऐन परिक्षेच्यावेळी सगळा घोळ होतो आणि मुलं आठवडाभर वाचलेलं सर्व विसरतात. तर काहीजणांना परिक्षेच्या प्रेशरमुळे काही लक्षात राहत नाही. (Top 6 Brain Foods for Children)

तुमच्याही मुलांच्या  बाबतीत असं होत असेल तर मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्यात काही पदार्थांचा समावेश करायला हवा. आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास त्यांची स्मरणशक्ती वाढेल आणि मुलं वाचलेलं लक्षात ठेवतील. (How to improve my child's memory brain foods for kids)

बेरीज खा

ब्लुबेरी, स्ट्रॉबेरी आणि अन्य एंटीऑक्सिडेंट्सयुक्त असतात. ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. मेंदूच्या पेशी डॅमेज होण्यापासून रोखता येतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्य़ंत सर्वचजण याचे सेवन करू शकता. 

लहान वयातच चष्मा लागला-नजर कमजोर झाली? रोज खा ५ व्हेज पदार्थ, चष्म्याचा नंबर होईल कमी

ड्रायफ्रुट्स

बदाम, अक्रोड, चिया सिड्स आणि आळशीच्या बिया ओमेगा-३ फॅटी एसिड्, एंटीऑक्सिडेंस् आणि व्हिटामीन ई सारख्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला बरेच फायदे मिळतात.

पालेभाज्या

पालक, केल आणि ब्रोकोली यांसारख्या पालेभाज्या, एंटीऑक्सिडंट्स, व्हिटामीन आणि मिनलरल्सनी परिपूर्ण असतात. यामुळे मेमरी बुस्ट होण्यास मदत होते. 

डार्क चॉकलेट

चॉकलेट्स मुलांना फार आवडतात. अशात तुम्ही त्यांना डार्क चॉकलेट्स खाऊ घालू शकता. यात एंटी ऑक्सिडेंट्स, कॅफिन आणि एनर्जी बुस्टर्स सारखी तत्व असतात जी फोकस आणि एकाग्रता वाढवतात. मग याचे सेवन  योग्य प्रमाणात करायला हवं.

घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल

अन्नधान्य

ब्राऊन राईस, गहू, ब्रेड आणि क्विनोआ ग्लुकोजची कमतरता पूर्ण करतात. यामुळे शरीराला एनर्जी मिळते. एकाग्रात वाढते आणि फोकस वाढतो. याशिवाय तब्येतीला बरेच फायदे मिळतात. याशिवाय दूध हा लहान मुलांचे मुख्य आहार असतो. मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दूधाचे सेवन करायाल हवे.

दूधात कॅल्शियम आणि व्हिटामीन्स असतात जे  हाडांच्या विकासास मदत करतात. दूधात फॉस्फरेस आणि व्हिटामीन डी असते. ज्यामुळे हाडं आणि नखं, दात चांगले राहतात. तूप खाल्ल्याने मेमरी चांगली राहण्यास मदत होते. याच डिएचए आणि गुड फॅट्स असतात. या दोन्ही गोष्टी मेंदूच्या विकासास मदत करतात. तूपात एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. याशिवाय तूप खाल्ल्याने इम्यूनिटी वाढण्यास मदत होते. 

टॅग्स :पालकत्वसुंदर गृहनियोजन