Join us  

सावळ्या रंगावरून हिणवल्यामुळे निताराने 'ही' गोष्ट कायमची सोडली- लेकीबद्दल ट्विंकल खन्ना सांगते....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2024 1:06 PM

Twinkle Khanna About Her Daughter Nitara: अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्नाच्या लेकीविषयी बघा नातेवाईकाने नेमकी काय कमेंट केली होती...

ठळक मुद्देयातूनच मुलांना वाचनाची आवड लागणे आणि त्यांची पुस्तकांशी गट्टी होणे किती गरजेचे आहे, हे देखील तिला नमूद करायचे आहे. 

बॉलीवूडमधली एक लोकप्रिय जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. या दोघांना दोन अपत्य. मोठा मुलगा आरव आणि धाकटी लेक नितारा. अक्षय आणि ट्विंकल दोघेही आपापल्या कामात बिझी असले तरी ट्विंकल तिच्या दोन्ही मुलांवर अगदी काटेकोर लक्ष ठेवून असते. मुलांना वाचनाची सवय लावणे, त्यांचे छंद विकसित करणे, याकडे तिचे लक्ष असते. तिच्या मुलीला कोणीतरी तिच्या सावळ्या रंगावरून काहीतरी बोलले आणि त्याचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला. यातून बाहेर पडण्यासाठी ट्विंकलने काय केलं, याविषयी ती नुकतीच व्यक्त झाली आहे. (Twinkle Khanna reveals about how the foolish comment about skin tone disappoint her daughter)

 

ट्विंकलसारख्या अनुभवातून जाणाऱ्या प्रत्येक आईला तिची ती पोस्ट उपयोगी ठरू शकते. नेमका काय प्रसंग झाला याविषयी ट्विंकलने टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक कॉलम लिहिला आहे. ती म्हणते की एकदा एका मुर्ख नातेवाईकाने माझ्या मुलीला म्हटले की तू दिसायला सुंदर आहेस, पण तुझा रंग तुझ्या दादासारखा गोरापान नाही.

जावेद हबीब सांगतात 'हा' पदार्थ मधात मिसळून चेहऱ्याला लावा- ॲक्ने, तेलकट त्वचेसाठी परफेक्ट उपाय

एवढ्याशा मुलीला रंगावरून बोलणे खरंतर चूक आहे. पण ते त्या व्यक्तीच्या लक्षात आले नाही. तो बाेलून गेला आणि इकडे मात्र नितारा खूप निराश झाली. आपण आधीच दादासारखे गोरे नाही. त्यात जर स्विमिंग शिकलो तर आणखी सावळे होऊ, त्यामुळे तिने स्विमिंग कायमचे सोडून दिले. 

 

स्वत:च्या रंगाविषयीचा हा न्यूनगंड तिच्या मनातून कायमचा काढून टाकण्यासाठी तिने मुलीला फ्रिदा काहलो यांचे आत्मचरित्र वाचायला दिले. ते वाचून तिच्यामध्ये बराच फरक पडला.

फक्त १ आवळा आणि अर्धी वाटी तेल, केस गळणं ८ दिवसांत होईल कमी- बघा काय करायचं...

जेव्हा एखादी गोष्ट मुलांना पटवून देण्यात आपण कमी पडतो तेव्हा पुस्तकं कशी उपयोगी पडतात, आपल्या कित्येक समस्यांवर कशी मार्ग दाखवतात, हे ट्विंकलने या उदाहरणातून सांगितलं आहे. यातूनच मुलांना वाचनाची आवड लागणे आणि त्यांची पुस्तकांशी गट्टी होणे किती गरजेचे आहे, हे देखील तिला नमूद करायचे आहे. 

टॅग्स :पालकत्वट्विंकल खन्नालहान मुलंअक्षय कुमार