Lokmat Sakhi >Parenting > ...नाही तर मुलांना फक्त आठवायचे मां के हाथ के पराठे! ट्विंकल खन्ना सांगतेय, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाविषयी तिचे प्लॅनिंग

...नाही तर मुलांना फक्त आठवायचे मां के हाथ के पराठे! ट्विंकल खन्ना सांगतेय, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाविषयी तिचे प्लॅनिंग

बायकांच्या दृष्टीनं आर्थिक स्वावलंबनाला (economically self empowerment) महत्व देणारी ट्विंकल (twinkle khanna) म्हणते की मी स्वत:साठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी कमावते. आईनं आपल्या शिक्षणाचा खर्च केला असं मुलांनी म्हणावं अशी ट्विंकलची इच्छा आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 04:19 PM2022-08-23T16:19:48+5:302022-08-23T16:41:25+5:30

बायकांच्या दृष्टीनं आर्थिक स्वावलंबनाला (economically self empowerment) महत्व देणारी ट्विंकल (twinkle khanna) म्हणते की मी स्वत:साठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी कमावते. आईनं आपल्या शिक्षणाचा खर्च केला असं मुलांनी म्हणावं अशी ट्विंकलची इच्छा आहे. 

Twinkle khanna talks about an importance of economically self empowerment of women and how she spend her money on her children education | ...नाही तर मुलांना फक्त आठवायचे मां के हाथ के पराठे! ट्विंकल खन्ना सांगतेय, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाविषयी तिचे प्लॅनिंग

...नाही तर मुलांना फक्त आठवायचे मां के हाथ के पराठे! ट्विंकल खन्ना सांगतेय, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाविषयी तिचे प्लॅनिंग

Highlightsट्विंकल म्हणते की वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या पहिल्या कमाईचा चेक आपल्या हातात आला.आपण अतिशय काटकसरीनं खर्च करतो असं ट्विंकल सांगते. ट्विक इंडिया हे महिलांसाठीचं डिजिटल व्यासपीठ ट्विंकलनं स्वत:च्या कमाईतून सुरु केलं आहे.

अभिनेत्री ट्विंकल खन्नानं  (twinkle khanna) अभिनय सोडून भरपूर वर्ष झालेत पण तरीही हे नाव कायम चर्चेत असतं. याला कारण म्हणजे ट्विंकल खन्न्नाचं प्रभावी व्यक्तिमत्व. अभिनयाशिवाय इतर अनेक गोष्टीत रस असणाऱ्या ट्विंकल खन्नाची आज इंटेरिअर डिझायनर, लेखक, निर्माती आणि उद्योजक अशी स्वतंत्र ओळख आहे.  या सर्व ओळखींसोबतच ट्विंकल नितारा आणि आरवची आई म्हणूनही ओळखली जाते.  बायकांच्या दृष्टीनं आर्थिक स्वावलंबनाला महत्व देणारी ट्विंकल म्हणते की मी स्वत:साठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी कमावते. 'ट्विक इंडिया' हे ट्विंकल खन्नाने सुरु केलेलं डिजिटल व्यासपीठ असून त्या व्यासपिठावर अभिनेत्री नेहा धुपियानं ट्विंकल खन्नाची मुलाखत घेतली आहे.  या मुलाखतीत ट्विंकल खन्नानं आर्थिक स्वावलंबनाविषयीची (economically self empowerment)  स्वत:ची मतं आणि अनुभव व्यक्त केले आहेत.

Image: Google

ट्विंकल सांगते की महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं जितकं महत्वाचं आहे तितकंच आपण कमावलेला पैसा आपण कसा खर्च करत आहोत याबाबत जागरुक असणंही महत्वाचं आहे. ट्विंकल म्हणते की 17 वर्षाची असताना आपल्या हातात आपल्या कमाईचा पहिला चेक आला. ही रक्कम लाडू वाटण्यासाठी पुरेशी होती. पण सिल्व्हर ओपेल कार खरेदी करण्यासाठी आपण ही कमाई बाजूला ठेवली. नंतर कार घेतली ती हफ्त्यांवर.

ट्विंकल सांगते की आपण कमावतो ते आपल्या स्वत:साठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी. नितारा आणि आरवच्या शिक्षणाचा खर्च आपण स्वत: करतो. पुढे जावून मुलांनी म्हणायला हवं की आईनं फक्त बटाट्याचे पराठेच खाऊ घातले नाही तर आमच्या शिक्षणाचा खर्चही आईनेच केला. मुलांच्या शिक्षणाचा खर्च एकहाती स्वत: करणारी ट्विंकल आपल्या कमाईतून बचत करुन येत्या वर्षी मास्टर कोर्सही पूर्ण करणार आहे. 

Image: Google

आपण कमावतो म्हणून कशावरही खर्च करायला स्वतंत्र अशा वृत्तीचे आपण नसल्याचं ट्विंकल सांगते. ट्विंकल पैसे गरजेपुरतेच आणि महत्वाच्या गोष्टींवरच खर्च करते. त्यासाठी तिने आपल्या गरजाही मर्यादित ठेवल्या आहेत. खर्चाच्या बाबतीतली तिची काटकसर बघून घरातले तिला 'तुला खर्चच करायचा नसेल तर तू कमावते कशाला? ' असं म्हणत चिडवतात. पण सांभाळून खर्च करणं हा आपला स्वभाव असल्याचं ट्विंकल सांगते.  स्वत:च्या कमाईतूनच ट्विंकलनं 'ट्विक इंडिया' ही महिलांसाठीची वेबसाइट सुरु केली. गरज असताना कोणीही या वेबसाइटमध्ये गुंतवणूक करायला पुढे आलं नाही तेव्हा आपण आपल्या कमाईतील बचत वापरली. आता सुध्दा आपल्याला मास्टर कोर्स करायचा असून त्यासाठीचा खर्च नितारासाठी ठेवलेल्या शिक्षणासाठीच्या पैशातून करणार असल्याचं ट्विंकल सांगते.

Image: Google

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या ट्विंकलचे बॅंकेत स्वतंत्र खाते आहे. आपण नवऱ्यासोबत जाॅइण्ट अकाउण्ट उघडलं नसल्याचं ट्विंकल अभिमानानं सांगते.  महिलांसाठीच्या डिजिटल व्यासपिठावरुन आर्थिक स्वावलंबनाचं महत्व ट्विंकलनं स्वत:च्या उदाहरणातून सांगितलं आहे आणि ते कोणत्याही आर्थिक स्तरातल्या स्त्रीसाठी महत्वाचे असेच आहे!


 

Web Title: Twinkle khanna talks about an importance of economically self empowerment of women and how she spend her money on her children education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.